रत्नागिरीत देखील उद्धव ठाकरे गटाला धक्का; २० नगरसेवकांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘आमचा पाठिंबा तुम्हालाच’ असा विश्वास देत रत्नागिरी नगर परिषदेतील 20 माजी नगरसेवकांनी आमदार उदय सामंत यांना आश्वस्थ केले. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेत खळबळ उडाली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेतील नगरसेवक नेमके कुणाच्या बाजूने असं तर्कवितर्क गेले काही दिवस लढवले जात होते. याला कारण याच नगरसेवकांबद्दल केले जाणारे दावे. मात्र, आता त्या नगरसेवकांनी पुढे येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शिवसेनेचे नेते अनंत गिते रत्नागिरी दौऱ्यावर दोन दिवसांपुर्वी आले होते. त्यावेळी शिवसेनेचे उपनेते राजन साळवी यांनी रत्नागिरी नगरपरिषदेतील 9 नगरसेवक शिवसेनेसोबत असल्याचा दावा केला होता. तसेच त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान सोमवारी सायंकाळी आमदार उदय सामंत यांची 20 नगरसेवकांनी शासकीय विश्रामगृह माळनाका येथे भेट घेतली.

दरम्यान नगरसेवकांनी आमचा पाठिंबा शिवसेनेत राहून उदय सामंत व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असल्याचा दावा केला आहे. यावेळी स्मितल पावसकर , मुसा काझी , निमेश नायर , राजन शेटये , कौशल्या शेटये , रोशन फाळके , दिशा साळवी, राजेश्वरी शेट्ये , श्रद्धा हळदणकर , विकास पाटील , सुहेल साखरकर , सुहेल मुकादम , वसंत पाटील, वैभवी खेडेकर , बावा नागवेकर , बंटी कीर , उज्ज्वला शेट्ये आदी उपस्थित होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांनी बंड शिवसेनेत मोठी उलथा पालथ झाली आहे. सुरुवातीला शिवसेनेचे चाळीस आमदार घेऊन शिंदेंनी बंड केला. सोबत आपली ताकद दाखवत त्यांनी भाजपसोबत जात सरकार देखील स्थापन केलं आणि मुख्यमंत्रीपदावर देखील विराजमान झाले. आमदारांनंतर त्यांनी १८ पैकी 12 खासदार देखील आपल्या गटात घेतले. या सर्व घडामोडीत विविध स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी देखील उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व सोडून शिंदेंच्या नेतृत्वात सामील होत आहेत.

दररोज कुठले ना कुठले शिवसेनेचे पदाधिकारी असतील किंवा सेनेच्या चिन्हावर लढलेले नगरसेवक असतील ते शिंदेंच्या गटात सामिल होत आहे. अशात रत्नागिरी नगरपालिकेतील माजी नगरसेवक कुणाकडे जाणार याकडे लक्ष लागले होते. शिवसेनेचे उपनते राजन साळवी यांनी रत्नागिरीचे नगरसेवक कुठेही जाणार नाही, असा दावा केला होता. मात्र, सोमवारी येथील २० माजी नगरसेवकांनी उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT