Rajyasabha: ‘त्या’ खासदारावरुन राडा… जाणून घ्या खासदार कधी आणि कसे होतात निलंबित?
मणिपूरमधील घटनेबाबत आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी सभापतींच्या खुर्चीसमोर जाऊन निषेध व्यक्त केला. यानंतर त्यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले. अशा परिस्थितीत खासदारांचे निलंबन कोणत्या नियमांतर्गत होते ते जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे (Aap) खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांना राज्यसभेतून (Rajyasabha) निलंबित करण्यात आले आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी संजय सिंह यांना संसदेच्या संपूर्ण पावसाळी अधिवेशन काळासाठी निलंबित केले आहे. (aap mp sanjay singh suspended rajya sabha know when and how a mp is suspended politics in marathi)
राज्यसभेतील नेते पियुष गोयल यांनी संजय सिंह यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. ते आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. संजय सिंग यांना ‘अशोभनीय वर्तन’ केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.
खरे तर, सोमवारी विरोधक मणिपूरमधील घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याच्या मागणीवर ठाम होते. तेव्हा सभापती जगदीप धनखड यांनी प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा केली जाईल, असे सांगितले. मात्र, प्रश्नोत्तराचा तास काही मिनिटेच चालला. यानंतर संजय सिंह सभापतींच्या खुर्चीजवळही आले. अध्यक्षांनी त्यांना परत जाण्यास सांगितले, मात्र त्यांनी ऐकलं नाही. त्यानंतर पीयूष गोयल यांनी त्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला.
यानंतर संजय सिंह यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठीच निलंबित करण्यात आले. म्हणजे या पावसाळी अधिवेशनात संजय सिंह राज्यसभेच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार नाहीत.