"पूल धोकादायक होता तर तिथे...", कुंडमळातील घटनेवरुन राज ठाकरेंचा सरकारवर संताप

मुंबई तक

मुळात हा प्रसंग का येतो ? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? असे संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

Raj Thackeray : पुण्यातील मावळ तालुक्यात कुंडमळा या ठिकाणी  इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळला. यामध्ये अनेकजण वाहून गेले. या घटनेत किमान 4 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं असून आणि 51 जण जखमी झाले. या प्रकरणावरुन आता राज ठाकरे यांनीही सरकारवर संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी या घटनेवरुन अनेक प्रश्न उपस्थित करत एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. 

राज ठाकरे काय म्हणाले?

"काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही जणं मृत्युमुखी पडलेत. नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. 

हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला ? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, 'बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे...'

हे ही वाचा >> पुणे- दौंड रेल्वे मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग; प्रवाशांचा जीव मुठीत, नेमकं घडलं काय?

पण मुळात हा प्रसंग का येतो ? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळयाच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही ? बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत ? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग ?

हे वाचलं का?