'एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर...' मनसेच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं आजवरचं सगळ्यात मोठं विधान
राज ठाकरेंच्या मनसेसोबत शिवसेना (UBT) युती करणार की नाही यावर उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आयोजित वर्धापन दिनावेळी बोलताना मोठं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: शिवसेना (UBT)च्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजप आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. पण याचशिवाय राज ठाकरेंसोबत युती होणार की नाही यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अत्यंत मोठं वक्तव्य केलं आहे.
'जे यांच्या मनात आहे आणि जे राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. पण ते होऊ नये.. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठीभेटी घ्यायला लागलेत.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे.
हे ही वाचा>> 'बाबा भरतशेठ +आघोरी विद्या = पालकमंत्री??', अजितदादांच्या नेत्याने Video शेअर करून वेळ साधली?
मात्र, यावेळी उद्धव ठाकरे यांनी हे देखील अधोरेखित केलं की, मनसेसोबतच्या युतीसाठी ते प्रयत्नशील आहेत. पाहा यावेळी उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले.
राज ठाकरेंसोबत युती करण्याबाबत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'ही लढाई केवळ उद्धव ठाकरेंची नाही, शिवसेनेची नाहीए. ही 1960 साली ज्या मराठी माणसाने बलिदान देऊन, रक्त सांडून ही मुंबई आपल्याला मिळवून दिली. त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आपल्यापासून तोडू देणार नाही. म्हणून जर आपण उभे राहिलो तर ही मुंबई वाचेल.'










