'चाल बदकाची, आवाज कोंबडीचा, डोळे कोणासारखे ते...', उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
Uddhav Thackeray criticized Nitesh Rane: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अत्यंत जहरी शब्दात टीका केली आहे. पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

मुंबई: शिवसेना (UBT)पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली आहे. याचवेळी त्यांनी मंत्री नितेश राणे यांचं नाव न घेता बोचरी टीका केली आहे.
'अरे तुझी उंची केवढी, आवाज कसा.. म्हणजे उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा.. डोळे कोणासारखे माहीत नाही.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
नितेश राणेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंनी काय केली टीका?
'हिंदी सक्तीची.. बसा बोंबलत तुम्ही.. हिंदी सक्तीची होणार.. आम्ही होऊ देणार नाही हे ठरवलेलंच आहे. पण त्यामध्ये झगडत ठेवायचं. बटेंगे तो कटेंगे.. त्यानंतर पुन्हा मराठा-मराठेतर हे भांडण लावून ठेवायचं. हिंदू-मुस्लिम आहेच.'
हे ही वाचा>> 'एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर...' मनसेच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं आजवरचं सगळ्यात मोठं विधान
'एक बेडूक ओरडतोच आहे त्यात.. त्याला काम तेवढंच दिलेलं आहे. अरे तुझी उंची केवढी, आवाज कसा.. म्हणजे उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा.. डोळे कोणासारखे माहीत नाही.'









