'एमआयएम'च्या नेत्याची गोळ्या घालून हत्या; असदुद्दीन ओवेसींना संताप अनावर

भागवत हिरेकर

MIM Leader Shot Dead in Bihar : एआयएमआयएमचे नेते अब्दुल सलाम ऊर्फ अस्लम मुखिया यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली.

ADVERTISEMENT

AIMIM state secretary and district president Abdul Salam alias Aslam Mukhiya shot dead.
एआयएमआयएमच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या.
google news

बातम्या हायलाइट

point

एमआयएमच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या

point

असदुद्दीन ओवेसी यांची नितीश कुमारांवर टीका

point

कार अडवून घातल्या गोळ्या

AIMIM leader abdul salam alias aslam mukhiya : एआयएमआयएमच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अब्दुल सलाम ऊर्फ अस्लम मुखिया असे हत्या झालेल्या नेत्याचे नाव आहे. या घटनेनंतर पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे. (AIMIM Leader Shot dead in Bihar)

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जळगावमध्येही भाजपच्या माजी नगरसेवकाची हत्या करण्यात आली. त्याचबरोबर कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला. या घटनांमुळे महाराष्ट्राचा बिहार झाला, अशी टीका विरोधकांकडून होत असतानाच आता बिहारमध्ये ही घटना घडली आहे. 

एमआयएमच्या नेत्याची हत्या

बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात ही घटना घडली. एमआयएमचे प्रदेश सचिव अब्दुल सलाम ऊर्फ अस्लम मुखिया असे गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या नेत्याचे नाव आहे. गोपालगंजमधील नगर पोलीस ठाणे हद्दीत एनएच ५३१ रस्त्यावर कार अडवून हत्या करण्यात आली. 


मयत अस्लम मुखिया यांनी नोव्हेंवर २०२३ मध्ये गोपालगंज विधानसभा पोटनिवडणूक लढवली होती. ते गोपालगंज मदरसा इस्लामियाचे सचिवही होते. मुखिया हे त्यांचे मित्र फैसल इमाम मुन्ना यांच्यासोबत लखनौला निघाले होते. रेल्वे स्टेशनकडे जात असतानाच मोटारसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांची कार थांबवली. त्यानंतर त्यांच्या गोळीबार केला. 

हे वाचलं का?