अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत? देवेंद्र फडणवीसांनी नेमंक ते सांगितलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit pawar will not be chief minister devendra fadnavis said exactly cm eknath shinde
ajit pawar will not be chief minister devendra fadnavis said exactly cm eknath shinde
social share
google news

Devendra Fadnavis : राज्यातील राजकारण वेगवेगळ्या मुद्यांनी ढवळून निघाले असतानाच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट केला. अपात्रतेच्या मुद्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे अपात्र होऊच शकत नाहीत. कारण तेवढा आम्ही कायद्याचा अभ्यास केला असून ते कोणत्याही परिस्थिती अपात्र होऊच शकत नाही असं सांगत त्यांनी अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्याबद्दलही एक गोष्ट त्यांनी स्पष्ट केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमचं कोणत्याही मुद्यावर मतभेद नसून आम्ही चांगल्या पद्धतीने सरकार चालवत असून आम्ही एकमेकांसोबत कंपर्टेबल आहे.(ajit pawar will not be chief minister devendra fadnavis )

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘एकनाथ शिंदे अपात्र होणारच नाहीत’, फडणवीसांनी थेट दावाच केला

इशारा वगैरे नाही

कोणतंही सरकार स्थिरपणे चालवायचं असेल, राजकीय कोण सोबत येत असेल तर का घेऊ नये असा प्रतिसवाल त्यांनी केले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी आमच्यासोबत येण्याचा विचार केला होता त्यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता आणि ते आम्ही केले आहे. त्यामुळे मी पुन्हा येईन हा व्हिडीओ पोस्ट करुन त्यांना इशारा वगैरे देण्याचा काही प्रश्नच नाही असंही त्यांनी टीव्ही 9 च्या दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

सरकारमध्ये आलबेल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मी पुन्हा येईन हा व्हिडीओ पोस्ट करुन डिलीट करण्यात आला. व्हिडीओ पोस्ट करुन सत्ता आणता येत नाही, आणि इशाराही देता येत नाही. मात्र आमच्या तिघांच्या सरकारमध्ये आमचं शंभर टक्के आलबेल असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हे वाचलं का?

कोणताही हस्तक्षेप नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांबद्दल बोलताना सांगितले की, अजित पवार आणि आम्ही एकमेकांच्या विश्वासाने कामं करतो. मात्र तरीही एकमेकांची राजकीय पार्श्वभूमी वेगवेगळी असल्यामुळे काही निर्णय आम्ही स्वतंत्र घेत असतो. त्यामुळे शिवसेनेचा काही विषय असेल तर मी किंवा अजित पवार यांच्याकडून कोणताही हस्तक्षेप केला जात नाही. तसेच त्यांच्या राष्ट्रवादीचा विषय असेल तर आम्ही त्यांच्यामध्ये काही हस्तक्षेप करण्याची गरज नाही असंही त्यांना यावेळी सांगितले.

हे ही वाचा >> खळबळजनक! दिवसढवळ्या 2 वृद्ध सख्या बहिणींची हत्या, नेमकं प्रकरण काय?

कार्यकाळ पूर्ण करणारच

राज्यातील सरकार स्थिर आणि राजकीय शक्ती वाढवण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे आमच्या सरकारची शक्ती वाढवण्यासाठी अजित पवार यांना विचारुनच आम्ही सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्यांना उपमुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे त्याप्रमाणे आम्ही ते केले आहे. तसेच एकनाथ शिंदे हे आपला कार्यकाळ पूर्ण करणारच असून आगामी काळातील निवडणुकाही त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT