‘अमोल शिंदे, सागर, नीलम आणि…’, संसदेच्या सुरक्षेची पोलखोल करणारे ‘ते’ चौघे आहेत तरी कोण?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Parliament Security Breach: नवी दिल्ली: उच्च सुरक्षा व्यवस्था असलेल्या संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (13 डिसेंबर) लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारली आणि स्प्रेद्वारे धूर पसरवला. घटनेनंतर लगेचच या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले.

या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. यानंतर काही वेळातच लोकसभेबाहेर आणखी दोन लोकांनी अशाच प्रकारे धुराचा वापर केला. याप्रकरणी चारही जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, संसदेत उडी मारलेल्यांची नावे सागर शर्मा आणि मनोरंजन अशी आहेत. तर नीलम (वय 42 वर्ष) आणि अमोल शिंदे (वय 25 वर्ष) यांना संसदेच्या बाहेर अटक करण्यात आली. जिथे त्यांनी घोषणाबाजी आणि धुराचा वापर केला.

कोण आहेत नीलम आणि अमोल शिंदे?

संसदेबाहेर ताब्यात घेण्यात आलेली नीलम ही हरियाणातील जींद येथील घसोस येथील रहिवासी आहे. तिच्या वडिलांचे हरियाणातील उचाना येथे मिठाईचे दुकान आहे. नीलम ही सुरुवातीपासूनच चळवळीत सक्रिय आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी आहे. या दोघांनीही ‘हुकूमशाही चालणार नाही’, ‘भारत माता की जय’, ‘जय भीम’, ‘जय भारत’ अशा घोषणा दिल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सागर आणि मनोरंजन कोण?

लोकसभेतून आत घुसलेल्या दोन जणांची नावं सागर आणि मनोरंजन असल्याचं समजतं आहे. मनोरंजन हा कर्नाटकातील असून तो व्यवसायाने ऑटोचालक आहे. तर सागर शर्मा हा उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊचा रहिवासी आहे. हे चार आरोपी एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते आणि ते सतत संपर्कात होते. दोघांनी मिळून संसदेत धुराचे फटाके जाळण्याचा कट रचला होता.

हे ही वाचा>> Amol Shinde: ‘पोलिसांना एवढंच म्हणालो, पोरगं मेलंय का तेवढं सांगा…’, अमोलच्या वडिलांची प्रतिक्रिया

या संपूर्ण प्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले की, लोकसभा आपल्या स्तरावर चौकशी करत आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनाही निर्देश देण्यात आले आहेत. ते म्हणाले, “सभागृहात पसरलेला धूर सामान्य होता. याबाबत काळजी करण्याची गरज नाही.”

ADVERTISEMENT

पोलीस काय म्हणाले?

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, या घटनेबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की नीलम आणि अमोल ( संसद भवनाबाहेर पकडले गेलेले) यांच्याकडे मोबाइल फोन नव्हते, तसेच त्यांच्याकडे कोणतीही बॅग किंवा ओळखपत्र नव्हते. ते असा दावा करतात की, आपण स्वतःहून संसदेत पोहोचलो आणि आपण कोणत्याही संघटनेत नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस विशेष पथक तयार करत आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> कोण आहेत भाजपचे खासदार प्रताप सिम्हा? ज्यांच्या पासवर सागर लोकसभेत घुसला

घटना कशी घडली?

लोकसभेत पीठासीन अधिकारी म्हणून अग्रवाल यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, सुरक्षेत त्रुटी राहिल्या आहेत. आम्हाला असं वाटलं की, एखादी व्यक्ती पडली. त्या दिशेने जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला दिसलं की, एक व्यक्ती उडी मारत आहे. एका व्यक्तीने त्याच्या बुटातून काहीतरी काढून धूर पसरवला. याबाबत तपासअंती नेमकं काय ते समजेल.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT