हायव्होल्टेज ड्रामा! जंतरमंतरवर जाण्यापूर्वीच अरविंद केजरीवाल अन् ममता बॅनर्जी पोलिसांच्या ताब्यात
अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जंतर-मंतरकडे जात असतानाच हाय व्होल्टेज ड्रामा रंगल्याचं पहायला मिळालंं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हायव्होल्टेज ड्रामा!
जंतरमंतरवर जाण्यापूर्वीच अरविंद केजरीवाल अन् ममता बॅनर्जी पोलिसांच्या ताब्यात
CJP Protest Delhi : दिल्लीत 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) आंदोलनादरम्यान पोलिसांनी आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोधी इस्टेटबाहेर ताब्यात घेतले आहे. तसेच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममचता बॅनर्जी यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. केजरीवाल यांच्याशिवाय आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह, सौरभ भारद्वाज आणि दुर्गेश पाठक यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. हे आंदोलन जंतरमंतरवर आयोजित करण्यात आले होते, जिथे केजरीवाल सहभागी होण्यासाठी जात असताना ही कारवाई करण्यात आली.
याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांसह तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते आक्रमक झाले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाचे पाच नेते यांना दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानाबाहेरून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा पक्षाचे माजी खासदार साकेत गोखले यांनी केला आहे. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्ली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांनी एका कैद्यांच्या व्हॅनमध्ये बसवून अज्ञात स्थळी नेले आहे. हा देशातील लोकसंस्थेचा आणि लोकशाहीचा अंत असल्याचे सांगत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आयोजित केलेल्या या आंदोलनात सहभागी होण्याचे संकेत ममता बॅनर्जी यांनी आधीच दिले होते. "आम्हाला कशाचीही भीती वाटत नाही, देशात काय चालले आहे हे सर्वांना माहीत आहे आणि आमचा हा लढा सुरूच राहील," असे म्हणत त्यांनी सरकारविरोधी भूमिका कायम ठेवल्याचे स्पष्ट केले.
