'बाळा, हे सरकार विचित्र आहे...' दिपकेंच्या आईला अश्रू अनावर, तर वडिलांचा संताप, काय म्हणाले?
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दिपकेंच्या आईला अश्रू अनावर
वडिलांचा संताप
काय म्हणाले?
Abhijit Dipke Father and Mother : सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. दिल्ली विमानतळावर विमान लँड झाल्यानंतर थेट विमानात शिरुन पोलिसांनी ही कारवाई केली. यानंतर तिघांना एका बसमधून विमानतळाच्या मागील बाजूच्या गेटमधून नेण्यात आलं. यानंतर त्या तिघांना वेगवेगळं ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय जवळपास 400 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मोदी आणि शहांविषयी काय म्हणाले?
अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याविषयी बोलताना त्यांचे वडील म्हणाले की, 'त्यांना अटक करण्यात आली आहे ते चुकीचं आहे. ते विद्यार्थ्यांना अटक करताहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिला आहे. यांना (सरकारला) लोकशाही मान्य नाही. मोदी आणि शहा हे गुजरातच्या दंग्यातून तयार झालेले दोन गुंड आहेत. हे लोकशाहीला मानणारच नाहीत. त्यांना लोकशाही नकोच आहे यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत हे. लोकशाहीला काळिमा फासणारी ही घटना आहे. आणीबाणीनंतर भारतात पहिल्यांदाच असं घडतंय.'
हे ही वाचा : पोलीस विमानात शिरले अन् एकच गोंधळ, घोषणाबाजी; दिपकेंना ताब्यात घेताना विमानात नेमकं काय घडलं? VIDEO
'बाळा, हे सरकार विचित्र आहे...'
अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आईनेही माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी सांगितलं की, ' अभिजीतला ताब्यात घेतलंय हे सरकारनं चुकीचं केलेलं आहे. त्याला जाताना मी म्हटलं होतं बाळा, हे सरकार विचित्र आहे. ते तुला अटक करतील. तर असं काही होणार नाही असं तो म्हणाला. तो काय पाकिस्तानी होता का? ते काय तिथे जाऊन दंगा करणार होते का? जे लाठ्या-काठ्या घेऊन रील्स टाकताहेत त्यांना सरकार काहीही करत नाहीये.'
हे ही वाचा : सीजेपी आंदोलनातील मोठी बातमी! युट्यूबर ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात, नेमकं काय घडलं?
केजरीवाल काय म्हणाले?
दरम्यान, अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर निशाणा साधताना म्हटलं की, हे आणीबाणी पेक्षाही भयंकर आहे. आपण मोदींच्या हुकूमशाहीत रहात आहोत हे आता अधिकृत आहे.'
