Aditya Thackeray : ‘युवराज म्हणजे तळ्या काठी खोटे ध्यान…’ आशिष शेलारांचा ठाकरेंवर पलटवार

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ashish shelar reply aditya thackeray letter war bjp vs thackeray group maharashtra politics
ashish shelar reply aditya thackeray letter war bjp vs thackeray group maharashtra politics
social share
google news

Ashish shelar Criticize Aditya Thackeray : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज संपू्र्ण महाराष्ट्रवासियांना खुले पत्र लिहून महायुती सरकारच्या कारभारावर ताशेऱे ओढले होते. आदित्य ठाकरेंच्या या टीकेनंतर आता त्यांच्याच स्टाईलमध्ये भाजप आमदार आशिष शेलार (Ashish shelar) जनतेला खुलं पत्र लिहून त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. युवराज (आदित्य ठाकरे) म्हणजे तळ्या काठी ‘खोटे ध्यान’ लावून बसणाऱ्या ढोंगी बगळ्यांच्या टोळीचे म्होरके आहेत. त्यामुळे यांच्या बोलण्यात आणि वागण्यात कशातच राम उरला नाही,असा पलटवार आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे. (ashish shelar reply aditya thackeray letter war bjp vs thackeray group maharashtra politics)

आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रवासियांना खुले पत्र लिहून महायुती सरकारवर टीका केली होती. या टीकेनंतर आता आमदार आशिष शेलार यांनी जनतेला उद्देशून पत्र लिहत त्याच शब्दात ठाकरेंचा समाचार घेतला आहे. हे पत्र त्यांनी एक्स या सोशल माध्यमावर शेअर केले आहे. या पत्रातून शेलारांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे.

शेलारांच्या पत्रात काय?

युवराज म्हणजे तळ्या काठी “खोटे ध्यान” लावून बसणाऱ्या ढोंगी “बगळ्यांच्या टोळीचे म्होरके” आहेत. यांच्या बोलण्यात, वागण्यात कशातच “राम” उरलेला नाही, अशा शब्दात आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ayodhya Ram Mandir: रामाची मूर्ती घडवणारा अरूण योगीराज प्रचंड चर्चेत, नेमका आहे तरी कोण?

तुम्हाला एका युवराजांचे पत्र आज मिळाले असेल, ते वाचून आमच्या मुंबईकरांना तर हसावे की रडावे असे झाले… ज्यांना आपला इतिहास माहिती नाही किंवा सोईस्कर विसरले असतील, किंवा श्रीमान संजय राऊत यांनी सांगितलेलाच इतिहास, भूगोल माहिती आहे अशा युवराजांनी भविष्य, भूतकाळ आणि वर्तमानाबाबत वैचारिक तारे तोडले आहेत. कुमार वयात केलेले हे भाष्य समजून तुम्ही हे सगळे सोडू द्या…नया है वह..! असे म्हणत शेलारांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली.

ADVERTISEMENT

कागदावरच आरेचे जंगल घोषित करणारे, आपल्या अहंकारासाठी आरेतील मेट्रो कारशेड अडवून ठेवणारे, मुंबईतील कचरा, सांडपाणी याची विल्हेवाट न लावणारे, प्रदुषणकारी प्रकल्पांचा दंड माफ करणारे हेच तथाकथित पर्यावरण प्रेमी आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री युवराज मुंबईला दूषित करण्यास जबाबदार असल्याचा आरोपही आशिष शेलारांनी केला.

ADVERTISEMENT

तसेच कट कमिशनसाठी मुंबईतील बिल्डरांना 12 हजार कोटींचा प्रिमियम माफ यांनीच केला. मुंबईत एकाच वेळी बांधकामे सुरु झाली आणि धुळीने मुंबईकरांचा आजही श्वास गुदमरतोय त्याला हेच युवराज जबाबदार आहेत, आणि हेच आज प्रदुषणाच्या नावाने उलट्या बोंबा मारताता असा हल्लाबोलही शेलारांनी ठाकरेंवर केला.

हे ही वाचा : कोल्हापुरात पाटील-महाडिक वाद पेटणार! साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना बेदम मारहाण

हे आज महाराष्ट्राच्या प्रश्नांवर, शेतकऱ्यांविषयी बोलतात, तुम्हाला आठवत असेलच.. बांधावर जाऊन मदत करणार… कर्जमाफी देणार अशा घोषणा दिल्या आणि अडीच वर्षे हेच घरात बसले होते, असा चिमटाही शेलारांनी ठाकरेंना काढला.

ठाकरेंच्या अपयशाची यादी किती मोठी आहे, अडीच वर्षात मराठा, ओबीसी आरक्षण घालवले, महाराष्ट्राचे प्रकल्प रोखले, महाराष्ट्रात प्रकल्प आला की विरोध करणारे, कट कमिशनच्या नादात मुंबई महापालिका लुटणारे, मराठी माणसाच्या घरांमध्ये ही कमिशन खाणारे, कोविडमध्ये मयताच्या बाँडी बँगमध्ये कमिशन खाणारे, रुग्णांच्या औषध, कामगारांच्या खिचडीत कट कमिशन कमावणारे..अडीच वर्षांत मंत्रालयातही न जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आज मगरीचे अश्रू ढाळत आहेत,असाही हल्ला शेलारांनी ठाकरेंवर चढवला.

राज्यात आता प्रकल्प येऊ लागले, परदेशी गुंतवणूक होऊ लागली पुन्हा महाराष्ट्र वेगवान झाला असताना या कामांमध्ये “गतिरोधक” म्हणून उबाठा काम करीत आहे अशा शब्दात शेलारांनी हल्लाबोल केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT