Ashok Chavan : काँग्रेसला हादरा, अशोक चव्हाणांकडून आमदारकीचा राजीनामा; पक्षही सोडला!

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

काँग्रेस ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षसदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
ashok chavan resignation from Congress membership join bjp speculation maharashtra politics
social share
google news

Ashok chavan resignation from Congress membership : काँग्रेस ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षसदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. या राजीनाम्याआधीच ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. आता ते भाजपात प्रवेश करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (ashok chavan resignation from Congress membership join bjp speculation maharashtra politics) 

ADVERTISEMENT

अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची भेट घेऊन विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या सर्व घडामोडीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला होता, तसेच या राजीनाम्यानंतर नाना पटोले पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.

हे ही वाचा:Devendra Fadnavis : अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर? फडणवीस म्हणाले, 'मला विश्वास...'

हे वाचलं का?

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या पत्रात काय? 

Ashok chavan letter

अशोक चव्हाण यांनी एक्स या सोशल मीडिया प्लँटफॉर्मवर राजीनाम्याची माहिती दिली आहे.  अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांनी पक्ष सदस्यत्व सोडण्यापूर्वीच आमदारकीचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट होत आहे. 

ADVERTISEMENT

फडणवीस काय म्हणाले? 

ADVERTISEMENT

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'मी तर तुमच्याकडून ऐकलं. काँग्रेसमधले अनेक चांगले नेते जे भाजपच्या संपर्कात आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच 'ज्या प्रमाणे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करतोय. त्यातून काँग्रेसचे जे जनतेचे नेते आहेत, ते पक्षात गुदमरतायत. त्यामुळे देशभरामध्ये हा ट्रेंड पाहायला मिळतोय, जनतेन नेते भाजपमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भाजप पक्षात येतील. हा मला विश्वास आहे, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

हे ही वाचा:Pankaja Munde: 'माझ्यासोबत राजकारणात दगाफटका झाला, माझा वनवास...', पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

अशोक चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. खासदारकीच्या तिकीट वाटपासाठी जेव्हा आम्ही तिन्ही पक्ष बसलो त्यात अशोक चव्हाण सुद्धा होते, काँग्रेसला कोणत्या जागेवर आपले उमेदवार उभे करायचे आहेत त्यासाठीच्या चर्चेत ते सुद्धा होते. अशा बातम्यांमध्ये तथ्य नाही. चर्चा होणे आणि राजीनामा देणे यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मला खात्री आहे अशोक चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे, अशा पद्धतीने महाविकास आघाडीला ते सोडून जाऊ शकणार नाही याची मला खात्री आहे, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख् यांनी म्हटले आहे.  

 

 

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT