Baba Siddique : तुरुंगात रचला सिद्दीकींच्या हत्येचा कट! 4 आठवडे रेकी, 3 शूटर 6 गोळ्या..., हत्याकांडात आतापर्यंत काय काय घडलं?
Baba Siddique Murder Case Update : बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणात आता एकामागून एक आरोपी अटकेत येत असल्या कारणाने या हत्येचा हळूहळु उलगडा होत चालला आहे. आतापर्यंत या प्रकरणात तीन आरोपींना अटक झाली आहे, तर तीन जण अद्याप फरार आहेत. त्यामुळे अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीत अनेक गोष्टींचा उलगडा होत चालला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सिद्दीकींच्या हत्येचा कट कसा रचला होता?
तूरुंगात कशी केली होती प्लानिंग?
शुटर्सना वाहन, हत्यार कोण पुरवत होता?
Baba Siddique Murder Case Update : बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणात आता एकामागून एक आरोपी अटकेत येत असल्या कारणाने या हत्येचा हळूहळु उलगडा होत चालला आहे. आतापर्यंत या प्रकरणात तीन आरोपींना अटक झाली आहे, तर तीन जण अद्याप फरार आहेत. त्यामुळे अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीत अनेक गोष्टींचा उलगडा होत चालला आहे. त्यामुळे या घटनेची प्लानिंग नेमकी कशी करण्यात आली होती? या हत्येचा कट कसा रचण्यात आला होता? हे जाणून घेऊयात. (baba siddique case update patiala jail lawrence bishnoi connection full story of murder case read full crime story )
इंडिया टुडेला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट हा पटियाला जेलमध्ये रचण्यात आला होता. या हत्येचा कट रचण्यात मोहम्मद झिशान अख्तरचे नाव समोर येत आहे. आणि हाच झिशान या हत्येचा मास्टरमाईंड असल्याची माहिती आहे.
घटनास्थळी बाबा सिद्दीकी यांच्यावर गुरुमेल सिंह, धर्मराज कश्यप आणि शिवकुमार यांनी गोळीबार केला होता. यापैकी धर्मराज आणि गुरमेल यांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे, तर झिशान, शुभम लोणकर आणि शिवकुमार फरार आहेत. त्यानंतर प्रवीण लोणकरलाही पोलिसांनी अटक केली होती. प्रवीण आणि शुभम हे भाऊ असल्याची माहिती आहे.
तुरूंगात केली हत्येची प्लानिंग
21 वर्षीय झिशान अख्तरला जालंधर पोलिसांनी 2022 मध्ये खून आणि दरोड्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सुत्रानुसार, तो पटियाला तुरुंगात बंद होता. या तुरूंगातच तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात आला होता. आणि इथेच त्याला बाबा सिद्दीकींच्या हत्येची सूपारी देण्यात आली होती. त्यानंतर यावर्षी 7 जूनला तुरुंगातून सुटल्यानंतर झिशानने हरियाणातील कैथलमध्ये जाऊम गुरमेल सिंग यांची भेट घेतली होती.










