"पाकिस्तानी नाही, आम्ही बलुचिस्तानी...", बलोच नेत्याकडून स्वातंत्र्याची घोषणा, तारीखही सांगितली
मीर यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं, "प्रिय भारतीय देशभक्त माध्यमं, यूट्यूबर ते आणि भारताच्या रक्षणासाठी लढणारे बुद्धिजीवी, कृपया सर्पांनी बलोच लोकांना 'पाकिस्तानचे नागरिक' म्हणू नका."
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

"आम्हाला पाकिस्तानी नागरिक म्हणू नका"

बलोच नेत्यानं केली स्वातंत्र्याची घोषणा
Independent Balochistan News : भारत पाकिस्तानच्या संघर्षावेळी बलुचिस्ताननं घेतलेल्या भूमिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून भारतीयांचं लक्ष बलोचिस्तावर होतं. त्यातच आता बलोचिस्तानमधून मोठी बातमी समोर आली आहे. बलुच नेते मीर यार बलोच यांनी बुधवारी दावा केला की, बलुचिस्तान कधीही पाकिस्तानचा भाग नव्हता. पाकिस्तान सरकारने अनेक दशकांपासून केलेले "हवाई बॉम्बस्फोट, नरसंहार" यांचाही उल्लेख त्यांनी केला आहे. तसंच त्यांनी भारतीय माध्यमांना विनंती केली की त्यांनी "बलुचिस्तानला 'पाकिस्तानचे लोक' असं संबोधू नये".
आम्ही तेव्हाच स्वातंत्र्य झालोय...
मीर बलुच यांनी केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याबद्दल मला एका पत्रकाराने विचारलं. तेव्हा मी सांगितलं होतं, की "11 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा ब्रिटीश बलुचिस्तान आणि उपखंड सोडत होते, तेव्हाच आम्ही आमचं स्वातंत्र्य आधीच घोषित केलं आहे."
हे ही वाचा >> पिंपरी चिंचवड हादरलं! चाकणमध्ये नाईट शिफ्टला निघालेल्या महिलेचा पाठलाग करुन केला अतिप्रसंग
मीर यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं, "प्रिय भारतीय देशभक्त माध्यमं, यूट्यूबर ते आणि भारताच्या रक्षणासाठी लढणारे बुद्धिजीवी, कृपया सर्पांनी बलोच लोकांना 'पाकिस्तानचे नागरिक' म्हणू नका. आम्ही पाकिस्तानी नाही, आम्ही बलुचिस्तानी आहोत. पाकिस्तानचे खरे नागरिक म्हणजे पंजाब प्रांतातले लोक. कारण त्यांना कधीही हवाई हल्ले, अपहरण किंवा नरसंहाराचा सामना करावा लागला नाही."
6 कोटी बलुच देशभक्त भारतासोबत...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला असताना, दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध लष्करी कारवाया केल्या. यातच मीर यांनी दावा केला की, "बलुचिस्तानातले त्यांचे लोक" भारताला पाठिंबा देत आहेत. यावर मीर म्हणाले, "बलुचिस्तान प्रजासत्ताक देशाचे लोक भारताच्या जनतेला पूर्ण पाठिंबा दर्शवतात. चीन पाकिस्तानला मदत करतोय, पण बलुचिस्तानचे लोक भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत. प्रिय मोदीजी, तुम्ही एकटे नाहीत, तुमच्यासोबत 6 कोटी बलुच देशभक्त आहेत." ही प्रतिक्रिया भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर आली.
हे ही वाचा >> पाकिस्तानमध्ये घुसून भारताने कसा केला हल्ला? पहिल्यांदाच पाहा Operation Sindoor चा संपूर्ण Video
दरम्यान, पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक आणि सुरक्षा संकटाचा सामना करतोय. भारतीय सशस्त्र दलांनी अलीकडेच पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दावा केला की, या कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले.
बलुचिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर मानवाधिकार उल्लंघन सुरू आहे. यात जबरदस्तीने गायब करणे, न्यायबाह्य हत्या आणि असहमतीच्या आवाजांचे दमन यांचा समावेश आहे. पाकिस्तानी सुरक्षा दल आणि दहशतवादी गट दोघांवरही या अत्याचारांचा आरोप आहे. या दीर्घकालीन संघर्षात सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय.