पाकिस्तानमध्ये घुसून भारताने कसा केला हल्ला? पहिल्यांदाच पाहा Operation Sindoor चा संपूर्ण Video

मुंबई तक

Operation Sindoor Video: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. इंडिया टुडे ग्रुपने AI द्वारे 'ऑपरेशन सिंदूर' चा एक व्हिडिओ तयार केला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Operation Sindoor AI Video: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) राबवून, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. आता आमच्या पार्टनर चॅनेल आज तकने एआय (AI) द्वारे या संपूर्ण ऑपरेशनचा एक व्हिडिओ बनवला आहे. ज्यामध्ये भारताने पाकिस्तानमध्ये कसा हल्ला केला हे आपल्याला समजणार आहे.

भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त

भारतीय सैन्याने एका मोठ्या कारवाईत हवाई हल्ले केले आणि पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेले 9 दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले. यानंतर, ऑपरेशन सिंदूरच्या तिसऱ्या रात्री भारताने पाकिस्तानच्या 11 एअरबेसवर हल्ला केला. ब्रह्मोस मिसाइलचा वापर करून पाकिस्तानचे 6 हवाई तळ उद्ध्वस्त केले.

हे ही वाचा>> 'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री भारताचा होता प्रचंड मोठा प्लॅन, कराचीत घडणार होतं भयंकर.. वाचा ही Inside स्टोरी

पाकिस्तामध्ये 100 किमी आत खोलवर कारवाई

भारतीय हवाई दलाने आणि लष्कराने सीमारेषा न ओलांडता पाकिस्तानच्या आत सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर बॉम्बहल्ला केला. याशिवाय पाकिस्तानमधील चार आणि पीओकेमधील पाच दहशतवादी तळांनाही लक्ष्य केलं.

प्राणघातक शस्त्रांचा वापर

या कारवाईत, भारतीय हवाई दलाच्या (IAF) आधुनिक लढाऊ विमान मिराज-2000 आणि सुखोई-30MKI ने बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अत्यंत अचूक पद्धतीने मारा केला. हे भाग जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे गड मानले जातात. भारतीय लढाऊ विमानांनी स्कॅल्प क्रूझ क्षेपणास्त्र आणि हॅमर मिसाइलचा वापर करून आपली हवाई ताकद पाकिस्तानला दाखवून दिली.

हे ही वाचा>> भारतात खळबळ उडवून देणारी Inside स्टोरी, पाकिस्तान दहशतवादी मसूद अझहरला देणार तब्बल 14 कोटी!

ड्रोन आणि यूसीएव्ही देखील वापरले जातात

ही कारवाई यशस्वी करण्यासाठी हवाई दलाने HAROP ड्रोन सारख्या शस्त्रांचा वापरही केला. राफेल विमानांनी लक्ष्यांवर मारा करण्यासाठी स्कॅल्प क्रूझ क्षेपणास्त्रासह डीप पेनिट्रेशन स्पाइस 2000 क्षेपणास्त्राचा वापर यावेळी करण्यात आला. भारतीय लष्कराने देखील या ऑपरेशनमध्ये शस्त्र, ड्रोन आणि यूसीएव्हीच्या मदतीने पाकिस्तानला बेजार करून टाकलं. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये भारतीय नौदलाचाही सहभाग होता त्यांनी सागरी क्षेत्रात  देखरेख ठेवत पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या.

ब्रह्मोस आणि हॅमर मिसाइलचा भयंकर मारा

भारताने आपल्या हवाई क्षेत्रात सुरक्षित राहून क्रूझ मिसाइल आणि ड्रोन वापरून POK आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. यासाठी राफेलसोबत ब्रह्मोस सुपरसॉनिक मिसाइलचा देखील वापर केला गेला, ज्याची रेंज 400-600 किमी आहे. या क्षेपणास्त्राने जैशचे बहावलपूर आणि मुझफ्फराबादमधील कमांड सेंटर आणि शस्त्रास्त्रांचे डेपो उद्ध्वस्त करण्यात मोठी कामगिरी बजावली. 

पाकिस्तानवर नेमका कसा हल्ला करण्यात आला? पाहा AI Video

हे वाचलं का?

    follow whatsapp