मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी समोर आली अन्, रामदास आठवले लगेच म्हणाले..

मुंबई तक

ADVERTISEMENT

In a press conference in Beed, Ramdas Athawale has demanded that RPI get a place in the cabinet expansion in the state. See what Athavale actually said.
In a press conference in Beed, Ramdas Athawale has demanded that RPI get a place in the cabinet expansion in the state. See what Athavale actually said.
social share
google news

बीड: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Govt) लवकरच मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होताच केंद्रीय राज्यमंत्री रामदार आठवलेंनी (Ramdas Athawale) मोठी मागणी केली आहे. ‘आगामी होत असलेल्या राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात रिपाईला सहभाग मिळावा अशी आमची मागणी आहे.’ अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. बीड येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (beed ramdas athawale demanded rpi get a place cabinet expansion state government latest news maharashtra politics)

बीड येथे रिपाईचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आपली भूमिका मांडताना आठवले म्हणाले की, यासंदर्भात नुकतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मित्र पक्षांची बैठक झाली आहे. यामध्ये मित्र पक्षांना सत्तेत सहभाग मिळावा यासाठी रिपाई, शिवसंग्राम पक्षाने मागणी केली आहे. आगामी काळात सत्तेत वाटा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या सकाळच्या शपथविधी संदर्भात पवाराच्या सहमतीने शपथविधी झाला असल्याचं फडणवीस यांनी सांगतले होते.

हे ही वाचा>> ‘वाटलं नव्हतं, मला मुख्यमंत्री…’, CM एकनाथ शिंदेंनी सांगितला प्रचंड इंटरेस्टिंग किस्सा

त्याला प्रत्युत्तर पवारांनी गुगलीत फडणवीसाची विकेट घेतली असं सांगितलं होते. त्यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. यात शरद पवारांच्या गुगलीने शिवसेना क्लीन बोल्ड झाली आहे. अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली. तसेच तेलंगणा येथील के सी आर यांचा पक्ष भाजपचा ए पक्ष आणि बी पक्ष नसल्याचे सांगून त्याचा परिणाम होणार नाही. असंही ते म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तेव्हा फडणवीसांनी दिलेलं मंत्रिमंडळात स्थान, आता शिंदे देणार मंत्रिपद?

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना 2019 साली सरकारच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनी रिपाईला स्थान दिलं होतं. त्यांच्या वाटेला तेव्हा एक मंत्रिपद आलं होतं. मात्र, आता राज्यातील सगळी समीकरणं बदलली आहे. आता फडणवीसांऐवजी शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते आपल्या मंत्रिमंडळात रिपाईंला स्थान देणार का पाहणं महत्त्वाचं आहे.

मात्र, असं असलं तरी सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय हा भाजपचे हायकमांड घेणार आहेत. त्यामुळे याबाबत आठवलेंच्या मागणीबाबत शिंदे किंवा फडणवीस हे निर्णय घेण्याऐवजी मोदी-शाहा हेच निर्णय घेतील.

ADVERTISEMENT

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर दिल्लीत खलबतं

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युतीने राज्यात सरकार स्थापन केले. सरकारला वर्षपूर्ण झाले असून, मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांचे डोळे विस्ताराकडे लागले आहेत. दरम्यान, मुख्यमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा झाल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> शरद पवारांच्या ‘त्या’ गुगलीवर गेली अजित पवारांची विकेट? फडणवीस ‘सेफ’?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासंदर्भात भेट घ्यावी लागते. त्याचा पाठपुरावा करावा लागतो. अनेक वेळा त्यासंदर्भातील बैठका देखील असतात. आणि अर्थातच तुमचा जो आवडता प्रश्न आहे की, तर विस्तार देखील आम्हाला करायचाच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्याबद्दल निर्णय घेतीलच, पण जुलै महिन्यात आम्ही विस्तार करू. तारीख कुणीच सांगत नाही.”

“केंद्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार आणि राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार यांचा आपापसात काहीही संबंध नाही. केंद्राचा कधी होणार, हे आम्हाला माहिती देखील नाही. आम्ही राज्याच्या विस्तारात जास्त इंटरेस्टेड आहोत,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं

    follow whatsapp

    ADVERTISEMENT