अखेर नाशिक अन् रायगडचे पालकमंत्री ठरले, कोणावर सोपवली जबाबदारी?

मुंबई तक

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. भरत गोगावले यांची रायगडच्या, तर गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Bharat Gogawale
Bharat Gogawale
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अखेर नाशिक अन् रायगडचे पालकमंत्री ठरले

point

कोणावर सोपवली जबाबदारी?

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. भरत गोगावले यांची रायगडच्या, तर गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी, तर गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न गेले अनेक महिने चर्चेत होता. महायुतीमध्ये या पदांसाठी रस्सीखेच सुरू होती. मुख्य नेत्यांमध्ये याबाबत एकमत होत नव्हते. अखेर रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे देण्यात आली आहे. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.