Kirit Somaiya यांचा आक्षेपार्ह Video, आव्हाडांच्या मुलीचं ‘ते’ ट्वीट प्रचंड चर्चेत

रोहित गोळे

किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओचं ज्या पद्धतीने राजकारण केलं जात आहे ते चुकीचे असल्याची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी घेतली होती. ज्याबाबत आता त्यांची मुलगी नताशा आव्हाड हिने प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

bjp leader kirit somaiya offensive video ncp mla jitendra awhad daughter natasha awhad reacted
bjp leader kirit somaiya offensive video ncp mla jitendra awhad daughter natasha awhad reacted
social share
google news

Kirit Somaiya latest news: मुंबई: भाजपचे (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ (offensive video) समोर आल्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. विरोधकांनी त्यांच्यावर तुफान टीका देखील केली. मात्र, असं असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (NCP mla Jitendra Awhad) यांनी मात्र, किरीट सोमय्यांवर ज्या प्रकारे टीका केली जात आहे ती चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. ‘हे काही योग्य नाही असं मला वाटतं. थोडीशी संवेदनशीलता राजकारण्यांनी बाळगायला हवी.’ असं आव्हाड काल म्हणाले होते. मात्र, आता त्यांच्या याच प्रतिक्रियेबाबत जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड (Natasha Awhad) हिने एक ट्वीट केलं आहे. जे सध्या खूपच चर्चेत आलं आहे. (bjp leader kirit somaiya offensive video ncp mla jitendra awhad daughter natasha awhad reacted latest update on maharashtra politics)

नताशा आव्हाड हिचं नेमकं ट्विट काय?

सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओनंतर जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलेलं की, ’30-40 वर्षे देऊन ह्या स्तरावर आलेला असतांना एखाद्याला 5 मिनिटांत उध्वस्त करणं हे मला तरी काही पटत नाही.’ आव्हाडांनी ज्या प्रकारची भूमिका घेतली त्याच भूमिकेचं त्यांची मुलगी नताशा आव्हाड हिने ट्विट करत ही गोष्ट अभिमानास्पद असल्याचं म्हटलं आहे.

हे ही वाचा >> Kirit Somaiya : सोमय्यांचे सर्व व्हिडीओ मुंबई पोलीस घेणार ताब्यात, कारण

नताशाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘बाबा,जेव्हा तुम्ही covid मध्ये सिरियस होतात,तेंव्हा हेच किरीटजी तुम्ही आजारी नाहीतच,नाटक करत आहात असे खोटे आरोप करत पुरावा मागत होते.तेंव्हा आपल्या परिवाराने यांच्यामुळे खूप मानसिक त्रास भोगले. तरी आज किरीटजींच्या खाजगी आयुष्याच्या हक्कांसाठी उभे राहिलात हे अभिमानास्पद आहे!’

हे वाचलं का?

    follow whatsapp