Sudhir Mungantiwar: "मंत्रिमंडळात माझं नाव असल्याचं सांगितलं आणि..."; सुधीर मुनगंटीवारांनी सगळंच सांगून टाकलं
Sudhir Mungantiwar Press Conference: नागपूरच्या राजभवनात काल रविवारी महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी भाजपच्या 19 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर मुनगंटीवाराचं मोठं विधान
"मंत्रिमंडळात माझं नाव आहे, असं सांगण्यात आलं आणि काल..."
सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?
Sudhir Mungantiwar Press Conference: नागपूरच्या राजभवनात काल रविवारी महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी भाजपच्या 19 आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकण्यात आली. परंतु, मागील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले गेले. याच पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय. "मी कधीच व्यथित होत नाही. पक्ष मला जे पद देतो, त्या पदासाठी मी काम करतो. मंत्रिमंडळात माझं नाव आहे, असं सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं. एवढाच मुद्दा आहे", असं मोठं विधान मुनगंटीवार यांनी केलं आहे.
माध्यमांशी बोलतान सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
"मी कधीच व्यथित होत नाही. पक्ष मला जे पद देतो, त्या पदासाठी मी काम करतो. मंत्रिमंडळात माझं नाव आहे, असं सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं. एवढाच मुद्दा आहे. कालपर्यंत नाव असताना ते का काढण्यात आलं, ते मला माहित नाही. बाकी मला याबद्दलची कोणतीही माहिती नाही. मी व्यथित नाही. कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून मी गोरगरिबांचे विषय मांडायचो. आता विधानसभेत मांडणार आहे.
हे ही वाचा >> Chhagan Bhujbal: छगन भुजबळ राष्ट्रवादीला करणार बायबाय? अजितदादांची सोडणार साथ? मोठी अपडेट आली समोर
तुमचं नाव अचानक का काढण्यात आलं? वरिष्ठांशी काही बोलणं झालं आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं आहे की, तुमच्यासाठी वेगळी जबाबदारी ठेवली आहे, यावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले, हा मग तेच खरं..सर्व त्यांनाच माहित असणार आहे. नितीन गडकरींच्या भेटीवर मुनगंटीवार म्हणाले, मोठ्या भावाची छोट्या भावासोबत असणारी भेट आहे. जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात, तेव्हा तेव्हा मी त्यांचे मार्गदर्शन घेतो. त्यांचं मार्गदर्शन हे नेहमी उचित असतं.
मुनगंटीवार पुढे म्हणाले,"मी आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी देवेंद्रजींचा मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिला, त्यावेळी भाषणात त्यांनी सांगितलं होतं, श्रद्धा आणि सबुरी.. तेच मार्गदर्शन केलं. विधानसभेत गोर गरिबांचे प्रश्न मांडण्याची माझी भूमिका असणार आहे. आता पुन्हा एकदा संसदीय आयुध वापरण्याची सवय विकसीत करायचीय. मी नाराज कधीच राहत नाही. काल आपल्याकडे जे होतं ते उद्या जाणार आहे. उद्या आपल्यापाशी नाही, ते परवा येणार आहे. ज्यांच्या कुटुंबातला मुलगा दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उभा राहतो".










