सेंटर पॉइंटः राष्ट्रवादी कॉंग्रेस नेमकं चालवतंय कोण? ‘ही’ Inside स्टोरी वाचून तुम्हीही व्हाल हैराण!

अभिजीत करंडे

पक्ष वाढवण्यासाठी ज्या नेत्यांचा कधीही फायदा झाला नाही असे चेहरे राष्ट्रवादी कांग्रेस राज्यसभेत आणि विधानपरिषदेत का दिसतायत? नेमके राष्ट्रवादीत कोण असे निर्णय घेतय? काय आहे अंतर्गत राजकारण? सगळं जाणून घ्या सेंटर पॉइंटमधून.

ADVERTISEMENT

center point abhijit  karande who is really running ncp you will be shocked after reading this inside story
सेंटर पॉइंट
google news

मुंबईः लहानपणी तुम्ही टोपीवाल्याची गोष्ट ऐकली असेल. एक टोपीवाला असतो, तो टोप्यांची विक्री करत एका गावावरून दुसऱ्या गावाला जात असतो. मध्ये जंगल लागते. मग दुपारच्या विश्रांतीसाठी तो तिथे थांबतो. जेवण वगैरे झाल्यानंतर थोडंसं अंग टाकतो, वामकुक्षीसाठी. तेवढ्यात एक माकड झाडावरून येते आणि टोप्यांची पेटी उघडून एक टोपी डोक्यावर घालते आणि परत झाडावर जाऊन बसते. आता एका माकडाची ती कृती बघितल्यानंतर सगळी माकडे त्याचं अनुकरण करतात. त्या पेटीतील टोप्या घेतात, डोक्यावर घालतात आणि झाडावर जाऊन बसतात.

थोड्या वेळाने व्यापाऱ्याला जाग येते. जाग आल्यावर बघतो तर काय, पेटीतल्या सगळ्या टोप्या गायब! वरती बघतो तर सगळे टोपीवाले! आता यांच्याकडून टोप्या काढून कशा घ्यायच्या हा त्याच्यासमोरचा सर्वात मोठा प्रश्न असतो. त्याच वेळेला तो त्यांना दगड मारून बघतो, त्यांची विनवणी करून बघतो, पण काही हाती लागत नाही. अखेर तो स्वतः, स्वतःची टोपी घालतो आणि ती टोपी काढून पेटीत फेकतो.

त्याची ही कृती बघितल्या बघितल्या सगळी माकडे पटापटा आपल्या डोक्यावरच्या टोप्या घेतात आणि पेटीत आणून टाकतात. मुद्दा काय आहे? मुद्दा आहे युक्तीचा. आता युक्ती ज्यावेळेला स्थितीत बदलते, त्यावेळेला सुद्धा अशा पद्धतीची परिस्थिती आपल्यासमोर येते. तुम्ही म्हणाल की नेमका या विषयाचा आणि आजचा संबंध काय आहे? तर ते समजून घेण्यासाठी याची Inside स्टोरी नक्की वाचा.

NCP ची खरी सूत्रं कोणाच्या हातात?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार या पक्षाचे, अजित दादा एकहाती सेनापती होते. ते रिंग मास्टर होते. ते हयात असताना त्यांच्यासमोर तोंड उघडण्याची हिंमत भल्याभल्यांची व्हायची. पण त्यांच्या निधनानंतर खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस कोण चालवतंय हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि म्हणून टोपीवाल्याची आठवण आली.

हे वाचलं का?