Maratha Reservation : ‘तुम्ही महाराज आहात ना मग…’, छगन भुजबळांच संभाजीराजेंना प्रत्युत्तर

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

chhagan bhujbal reply sambhaji raje on demand of resignation maratha reservation manoj jarange patil maratha reservation
chhagan bhujbal reply sambhaji raje on demand of resignation maratha reservation manoj jarange patil maratha reservation
social share
google news

Chhagan Bhujbal Criticize Sambhaji Raje Bhosale : जालन्यातील ओबीसी एल्गार परीषदेतून मंत्री छगन भूजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना (Manoj jarange Patil) लक्ष्य केले होते.त्यानंतर संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी मंत्री छगन भूजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. संभाजीराजेंच्या याच विधानावर आता छगन भूजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ”राजे, तुम्ही एका समाजाची बाजू कशी घेता”,”तुम्ही महाराज आहात ना मग सगळ्यांना न्या द्या”, अन्याय होणार नाही याची काळजी घ्या”,असे छगन भुजबळ म्हणाले आहेत. (chhagan bhujbal reply sambhaji raje on demand of resignation maratha reservation manoj jarange patil maratha reservation)

नाशिकच्या एका सभेत छगन भूजबळ बोलत होते. कुणी येतो म्हणतो,याला मंत्रिपदावरून काढा, याची आमदारकी काढा…आयुष्यात मंत्री, आमदार होणे हेच सर्वस्व आहे का? असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला. छगन भुजबळाच्या लेखी मंत्रीपद, आमदारकीपेक्षा समाजातील 7-8 कोटी लोकांच आणि देशातील 54 ट्क्के लोकांसाठी 35 वर्ष लढलो हे महत्वाच आहे आणि पुढे सुद्धा लढत राहणार आहे.

हे ही वाचा : Nalasopara Crime : बापच झाला सैतान! मुलीवर आधी बलात्कार, नंतर केलं असं काही की जीवच गेला

भुजबळ पुढे म्हणतात, ”राजे तुमचा आदर आणि सन्मान करतो, कारण आमच्या हदयात असलेले शाहू महाराज हे मागासवर्गीयांसाठी लढायचे”. ”त्या शाहु महाराजांच्या गादीवर तुम्ही आहात”. ”तुम्ही फक्त एका समाजाचे नाहीत, तर राज्यातील सर्व समाजाचे आहेत”. त्यामुळे तुम्ही एका समाजाची बाजू कशी घेता, असा सवाल भुजबळ यांनी संभाजीराजेंना विचारला. तसेच ”राजे तुम्ही आरक्षणामध्ये पडायला नको होतं. फक्त सांगितलं पाहिजे होतं सगळ्यांचे अधिकार शाबुत ठेवा. ही अपेक्षा तुमच्याकडून होती, असे भुजबळ म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लोकांची घरदार जाळली गेली, तुम्ही बीडला जायला पाहिजे होतं, त्यांचे अश्रू पुसायला पाहिजे होते. दोन महिने राज्यात काय चाललंय? पण यावर तुम्ही गप्प बसलात. तुमचं काम होतं त्याना समजावण्याचे, असं करू नका रे बाबांनो,असे भुजबळ म्हणाले. ”राजे, तुम्ही महाराज आहात ना, मग एका समाजाची बाजू कशी घेता, सगळ्यांना न्या द्या, अन्याय होणार नाही याची काळजी घ्या”,असेही भुजबळ म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Crime : चिमुकल्याचा घोटला गळा अन् बेडमध्ये लपवला मृतदेह, काकाने पुतण्याला का संपवलं?

भुजबळ पुढे म्हणाले, महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यात आला, लोकांच्या घर जाळता त्याला माझा विरोध आहे. तसेच शिवरायांनी कधी सांगितल गोरंगरीबांना, महिलांना त्रास द्या, जाळपोळ करा,असा सवाल त्यांनी मराठा समाजाला केला. तुमच्या विरूद्ध काय बोललो आम्ही, आमच्यात येऊ नका,वेगळ घ्या, म्हणून एवढच…तुम्ही काही केलं तरी आम्ही काहीच बोलायचं नाही. आम्ही मेंढर आहोत का? असा सवाल त्यांनी केला. तसेच छगन भुजबळला ना मंत्रिपदाची, ना आमदारकीची परवा नाही, तो लढेल तर गोरगरीबांसाठी लढेल, असेही भुजबळ यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT