Sunil Kedar : ‘भगवान के घर देर है…अंधेर नहीं…!’ राष्ट्रवादीच्या नेत्याचे सूचक ट्विट
महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमचे सहकारी सुनील केदार यांना जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालाविरुद्ध अपील करण्याची संधी न देता त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची सरकारला इतकी घाई का लागली आहे?
ADVERTISEMENT
काँग्रेसचे विदर्भातील महत्त्वाचे नेते सुनील केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात दोषी ठरवत पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेमुळे सुनील केदार (sunil kedar) यांची आमदारकी रद्द झाली आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. या प्रकरणात आता शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. नागपूरात भाजपची चांगलीच कोंडी करून ठेवली होती, त्याचा वचपा काढण्याचा हा डाव असल्याची टीका जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी भाजपवर केली आहे. (congress mla sunil kedar disqualified nagpur bank scam sharad pawar group jitendra awhad reaction)
ADVERTISEMENT
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून या प्रकरणावर भाष्य करत भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. नेमकं ते ट्वीटमध्ये काय म्हणाले आहेत. हे जाणून घेऊयात.
जितेंद्र आव्हाडांचे ट्विट जसच्या तस
केंद्राची किड आता राज्यालाही लागली आहे. भाजप सरकारला निलंबनाचा रोग झालाय. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींचं सरळ मार्गाने काही वाकडं करता येत नाही म्हणून मिळेल त्या संधीचा वापर करून आमदार, खासदारांवर त्यांनी कारवाईचा सपाटा लावलाय.
हे वाचलं का?
हे ही वाचा : मैत्रिणीशी लग्नासाठी घेतले लिंग बदलून, नकार मिळताच वाढदिवसालाच जाळलं जिवंत
महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमचे सहकारी सुनील केदार यांना जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालाविरुद्ध अपील करण्याची संधी न देता त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची सरकारला इतकी घाई का लागली आहे? केदारे यांनी नागपूरात भाजपची चांगलीच कोंडी करून ठेवली होती, त्याचा वचपा काढण्याचा हा डाव आहे.
निकालाविरूद्ध न्यायालयात अपील करण्याची संधी हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा संवैधानिक अधिकार आहें. पण आधी आरएसएस आणि आता भाजपने संविधान न मानण्याची आणि बदलण्याची शपथ घेतली असल्याने ते मनाला वाट्टेल तसं वर्तन करत आहेत. पण संविधानाची निर्मिती आमच्या बापाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे, हे विसरू नका. सत्ताधारी आमदार, खासदारांना एक न्याय आणि विरोधी पक्षाला दुसरा हा भाजपचा दुटप्पीपणा आता लपून राहिलेला नाही. “भगवान के घर देर है… अंधेर नहीं…!” असे ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Arbaaz Khan-Shura Khan Lovestory : ‘लागलं सजनीला सजनाच याड’, अरबाज-शूरा कसे पडले प्रेमात?
केंद्राची किड आता राज्यालाही लागली आहे. भाजप सरकारला निलंबनाचा रोग झालाय. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींचं सरळ मार्गाने काही वाकडं करता येत नाही म्हणून मिळेल त्या संधीचा वापर करून आमदार, खासदारांवर त्यांनी कारवाईचा सपाटा लावलाय.
महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते… pic.twitter.com/YJUW7qAEHI
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 25, 2023
ADVERTISEMENT
प्रकरण काय?
दरम्यान काँग्रेस नेते सुनील केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटींच्या रोखे खरेदी घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले. या प्रकरणात नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ज्योती पेखले-पुरकर यांनी पाच वर्षांची शिक्षा आणि 12.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला. या शिक्षेमुळे आता सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. विधिमंडळ सचिवालयाने याबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT