"तुमच्या अंगावरचे कपडे, तुझ्या बापाला पेरणीला 6,000 आम्ही दिले... ", BJP आमदार लोणीकर यांच्या वक्तव्यानं वाद होणार?

मुंबई तक

लोणीकर म्हणाले, “पारावर बसणारे काही रिकामचोट तरुण लिहितात की, गावातील 9-10 लोक माझ्या दावणीला बांधलेले आहेत आणि ते मोदी-फडणवीसांचे अंधभक्त आहेत. हे लोक विचारतात की, मोदींनी काय दिलं?

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजप आमदार बबनराव लोणीकरांचं वक्तव्य

point

टीका करणाऱ्यांना काय म्हणाले बबनराव लोणीकर?

जालना : परतूर तालुक्यातील वाटूर गावात ‘हर घर सोलर’ योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजपा आमदार बबनराव लोणीकर बोलत होते. यावेळी त्यांनी गावकऱ्यांवर वक्तव्य केलीत, ज्याची चर्चा सध्या सुरूय. "कुचर वट्ट्यावर" (पारावर) बसणाऱ्यांना विशेषत: तरुण ‘रिकामचोट’ आहे म्हणत त्यांनी टीका केली. हेच गावातील 9/10 लोक भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त असल्याची टीका करतात असं ते म्हणाले. तसंच पुढे त्यांनी सरकारकडून वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांवरही निशाणा साधला. 

हे ही वाचा >> 6 वर्षाच्या चिमुकल्यावर कुत्र्यांचा हल्ला, लचके तोडले, दाताने धरून फरफटत नेलं, थरकाप उडवणारा CCTV

टीका करणाऱ्यांना काय म्हणाले लोणीकर? 

लोणीकर म्हणाले, “पारावर बसणारे काही रिकामचोट तरुण लिहितात की, गावातील 9-10 लोक माझ्या दावणीला बांधलेले आहेत आणि ते मोदी-फडणवीसांचे अंधभक्त आहेत. हे लोक विचारतात की, मोदींनी काय दिलं? फडणवीसांनी काय दिलं? आणि आमदाराने काय दिलं? पण, गावात जे काही मिळालं, ते गेल्या 25 वर्षांत मीच दिलं. इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्याने तुम्हाला माचिसची डब्बीही आणून दिली नाही.”

काय म्हणाले लोणीकर?

त्यांनी पुढे सांगितलं, “या तरुणांच्या आईची पगारही मी सुरू केली, त्यांच्या वडिलांची पेन्शन मी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या वडिलांना बियाण्यासाठी 6 हजार रुपये दिले. ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत त्यांच्या आई, बहीण आणि पत्नीच्या नावावर पैसे आले. त्यांच्या अंगावरचे कपडे, पायातील चप्पल-बूट आणि हातातील मोबाइल हे सर्व आमच्या सरकारच्या कृपेने आहे. तरीही हे लोक आमच्याचविरोधात बोलतात.”
 

विरोधी पक्षनेते दानवेंची टीका

"ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव. कारण.. तुमचे कपडे,बूट या जनतेमुळे.. आमदारकी जनतेमुळे...तुमच्या गाडीतील डिझेल जनतेमुळे.. तुमचे विमानाचे तिकीट जनतेमुळे.. नेतेगिरी जनतेमुळे.. विधानसभेतील स्थान जनतेमुळे.." असं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लोणीकरांना उत्तर दिलंय. 

हे वाचलं का?

    follow whatsapp