शिंदे-ठाकरे यांच्या मनोमिलनासाठी प्रती दादा कोंडकेंचे प्रयत्न सुरुच : आता उपोषणाला बसणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : प्रती दादा कोंडके अर्थात उत्तम शिंदे दसऱ्याच्या मुहूर्तावर आझाद मैदानावर आत्मक्लेश उपोषणाला सुरुवात करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना कायम रहावी, अखंड शिवसेनेची ताकद किंगमेकर म्हणून रहावी, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे यासाठी त्यांचे हे प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला. शिंदे यांनी यापूर्वी याच कारणासाठी सोलापूर ते मुंबई अशी पायी वारी केली होती.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात विभागली गेली आहे. मात्र ही शिवसेना पुन्हा एकत्रित यावी यासाठी सोलापुरातील प्रती दादा कोंडके उत्तम शिंदे यांनी आपण मागील अनेक दिवसांपासून प्रयत्नशील असल्याचा दावा केला. ते म्हणाले, माझी दोन्ही साहेबांना विनंती आहे, की दोघांनीही दोन दोन पाऊलं मागे यावे आणि अखंड शिवसेना ठेवावी. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही स्वराज्य संकटात आले होते तेव्हा तह केला होता.

उत्तम शिंदेंची सोलापूर ते मुंबई पायी वारी :

जुलै महिन्यामध्ये उत्तम शिंदे यांनी ठाकरे-शिंदेंच्या मनोमिलनासाठी सोलापूर ते मुंबई अशी पायी वारी केली होती. सोलापूरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करुन शिंदे यांनी 25 दिवसांची पायी वारी सुरु केली होती. मात्र, त्याला यश आले नाही. येत्या विजयादशमीला शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून दसरा मेळावा घेतला जाणार आहे. त्यामुळे शिंदे यांनी उद्यापासून आझाद मैदानावर आत्मक्लेश उपोषणासाठी बसण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचलं का?

कोण आहेत उत्तम शिंदे :

उत्तम शिंदे हे मुळचे सोलापूरचे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे हे त्यांचे गाव. आपण लहानपणापासूनच एक शिवसैनिक म्हणूनच काम करत असल्याचे ते सांगतात. राज्यात विविध निवडणूकावेळी प्रचारक म्हणून ते काम करत असल्याचा दावा करतात. कधीच कोणत्या पदाची अपेक्षा केली नाही. पोटाला चिमटा घेऊन पायाला भिंगरी बांधून हा शिवसैनिक शिवसेनेच्या प्रचार अन प्रसारासाठी धडपडतो, असेही शिंदे सांगतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT