रवींद्र चव्हाण म्हणाले, लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, रितेश देशमुखची 3 वाक्यात भावुक प्रतिक्रिया

मुंबई तक

Riteish Deshmukh on Ravindra Chavan : "खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येतंय की, विलासराव देशमुखांच्या आठवणी लातरमधून 100 टक्के पुसल्या जातील. यात काही शंका नाही", असं रवींद्र चव्हाण म्हणाले होते. दरम्यान, आता अभिनेता आणि विलासराव देशमुख यांचा पुत्र रितेश देशमुख याने रवींद्र चव्हाण यांना 3 वाक्यात प्रत्युत्तर दिलंय. रितेश देशमुख नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात...

ADVERTISEMENT

Riteish Deshmukh
Riteish Deshmukh
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रवींद्र चव्हाण म्हणाले, लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील

point

रितेश देशमुखची 3 वाक्यात भावूक प्रतिक्रिया

Riteish Deshmukh on Ravindra Chavan : लातूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये भाजपच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राज्यभरातील काँग्रेस नेत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. "खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येतंय की, विलासराव देशमुखांच्या आठवणी लातरमधून 100 टक्के पुसल्या जातील. यात काही शंका नाही", असं रवींद्र चव्हाण म्हणाले होते. दरम्यान, आता अभिनेता आणि विलासराव देशमुख यांचा पुत्र रितेश देशमुख याने रवींद्र चव्हाण यांना 3 वाक्यात प्रत्युत्तर दिलंय. रितेश देशमुख नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात...

रितेश देशमुख म्हणाला, दोन्ही हात वर करुन सांगतो. "लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही...जय महाराष्ट्र...", अशी प्रतिक्रिया अभिनेता रितेश देखमुख याने दिली आहे. 

हेही वाचा : राज ठाकरेंना धक्का, नितेश राणेंनी खास माणूस फोडला, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष धुरींची पहिली प्रतिक्रिया

अमित देशमुख यांची प्रतिक्रिया

दरम्यान, रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याबाबत बोलताना अमित देशमुख म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये येऊन जे विधान केलंय त्यावरून, हा पक्ष कुठल्या स्तरावर राजकारनाला घेऊन चालला आहे हे दिसून येत आहे. लातूरची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती. त्यांच्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातूनही असाच निषेध होताना दिसत आहे... विद्यमान राज्य सरकारच्या कार्यकाळात निवडणुकीच्या दरम्यान लोकांना धमकावणे, पैशाचे अमिष दाखवणे, एवढेच नव्हे तर उमेदवार पळवणे, त्यांच्या अपहरण करणे, खून , हिंसाचार घडवणे इथपर्यंतच्या घटना घडत आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी ओळख कधीच नव्हती, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राची ही नवी ओळख निर्माण करू पाहतो आहे का? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे...

हे वाचलं का?

    follow whatsapp