Inside Story: ‘वर्षा’वर रंगली खलबतं, CM एकनाथ शिंदेंची आमदारांसमोर मोठी घोषणा

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

eknath shinde chief minister post resigning rumors shinde made a big announcement in front shiv sena mla mp maharashtra politics update
eknath shinde chief minister post resigning rumors shinde made a big announcement in front shiv sena mla mp maharashtra politics update
social share
google news

Maharashtra Politics Update Today: मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Govt) एक वर्ष पूर्ण होऊन दोन दिवस उलटत नाही तोच राज्यात एक मोठा राजकीय भूकंप झाला. हा राजकीय भूकंप म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि 9 आमदारांनी थेट मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या याच एंट्रीमुळे शिवसेनेत (Shiv Sena) मात्र प्रचंड नाराजी असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. याचवेळी अशीही चर्चा सुरू झाली की, एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील. या सगळ्या गदारोळातच आज (5 जुलै) मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शिवसेनेच्या आमदार-खासदारांची बैठक पार पडली. यावेळी शिंदेंनी आपल्या आमदारांसमोर एक मोठी घोषणा केली आहे. (eknath shinde chief minister post resigning rumors shinde made a big announcement in front shiv sena mla mp maharashtra politics update)

ADVERTISEMENT

अजित पवारांच्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदे हे नाराज असून ते राजीनामा देतील अशी चर्चा जोर धरत होती. याबाबतची सगळी नाराजी ही शिवसेनेच्या आमदार-खासदारांनी शिंदेंसमोर बोलून दाखवली. ज्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत तेच मुख्यमंत्री असतील आणि 2024 निवडणुकीनंतरच देखील तेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. ज्याबाबत त्यांना दिल्लीच्या नेत्यांनी आश्वासनही दिलं आहे.

हे ही वाचा>> ‘खोटं बोललो तर पवाराची अवलाद सांगणार नाही..’, अजित पवारांनी काय दिलं चॅलेंज?

‘वर्षा’वर शिवसेना आमदारांसोबत काय खलबतं रंगली?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजीनाम्याच्या सर्व चर्चा या अफवा असल्याचं म्हटलं आहे. आपल्या सर्व मंत्री, आमदार आणि खासदारांना संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले की विधानसभा निवडणुकीपर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील आणि 2024 चा मुख्यमंत्री देखील एकनाथ शिंदेच असतील.

एकनाथ शिंदे पुढे असंही म्हणाले की, ‘माझ्या राजीनाम्याच्या बातम्या कोण पेरत आहेत हे देखील मला माहीत आहे. पण आपण या सगळ्याबाबत योग्य ती काळजी नक्कीच घेऊ. त्याचप्रमाणे संकटकाळात पाठिंबा देणाऱ्या सर्व 50 आमदारांना आपण निराश करणार नाही.’

अजित पवार आणि त्यांच्या गटाला सरकारमध्ये समाविष्ट केल्यामुळे असुरक्षित झाल्याच्या वृत्तावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘तुमच्यापैकी कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. कारण मी अजूनही मुख्यमंत्री आहे आणि सरकारवर माझं संपूर्ण नियंत्रण आहे.’

‘अजित पवारांचा सरकारमधील प्रवेश म्हणजे केवळ राजकीय तडजोड आहे. ही तडजोड शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्या विरहीत आहे. त्यामुळे यापुढे घराणेशाहीच्या राजकारणाला आता स्थान मिळणार नाही.’ असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> शरद पवार छगन भुजबळांवर बरसले; म्हणाले, “बडवे येऊ देत नाही”

मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या सर्व आमदारांना त्यांच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.

तसेच, विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी पाच आमदारांची नियुक्ती करणार असल्याचे शिंदेंनी आमदारांना सांगितलं आहे. तरीही काही अडचण आल्यास सर्व आमदार माझ्याशी संपर्क साधू शकतात. पंधरा दिवसांनी म्हणजे महिन्यातून दोनदा सर्व आमदारांना भेटू. असे आश्वासन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT