‘खोटं बोललो तर पवाराची अवलाद सांगणार नाही..’, अजित पवारांनी काय दिलं चॅलेंज?

मुंबई तक

ADVERTISEMENT

In 2017, Sharad Pawar held talks with the BJP to remove the Shiv Sena and form the government. Ajit Pawar has made such a big secret explosion in his speech.
In 2017, Sharad Pawar held talks with the BJP to remove the Shiv Sena and form the government. Ajit Pawar has made such a big secret explosion in his speech.
social share
google news

Ajit Pawar Speech: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाची आज (5 जुलै) वांद्रे येथे बैठक पार पडली. यावेळी बंड केलेल्या अनेक नेत्यांनी बऱ्याच मुद्द्यांवरुन थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. याच वेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) तर अनेक गोष्टींबाबत शरद पवारांनी विपरित भूमिका घेतल्याचं म्हणत शब्द न पाळल्याचे आरोपही केले आहेत. याशिवाय शरद पवारांनी अनेकदा भाजपसोबत (BJP) सत्ता बनविण्याबाबत चर्चा केली होती. असा गौप्यस्फोट अजित पवारांनी आपल्या भाषणात केला आहे. (2017 sharad pawar talks with bjp remove shiv sena form government with ncp ajit pawar big secret explosion speech)

‘कुठली खाती, कुठली पालकमंत्री पदं सगळं ठरलं होतं.. मी कधीही महाराष्ट्राला खोटं बोलणार नाही. खोटं बोललो तर पवाराची अवलाद सांगणार नाही.. त्यामध्ये ते ठरलं.. आम्हाला निरोप आला.. सुनील तटकरेंना दिल्लीला बोलवलं. दिल्लीला त्यांच्या वरिष्ठांच्या बरोबर आपले वरिष्ठ आणि सुनील तटकरेंची बैठक झाली होती. पण शरद पवारांना शिवसेना सत्तेत नको होती म्हणून भाजपसोबतची ठरलेली समीकरणं ही शेवटच्या क्षणी रद्द झाली.’ असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

‘शरद पवारांनी आम्हाला सांगितलं वानखेडेवर शपथविधीला जा…’

‘2014 साली जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आम्ही सगळे जणं सिल्व्हर ओकला बसलो होतो. निकाल येत होते. प्रफुल भाई आणि साहेबांचं बोलणं झालं. प्रफुल भाईंनी सांगितलं की, आम्ही बाहेरून भाजपला पाठिंबा देतो. आम्ही गप्प बसलो.. का तर नेत्यांचा निर्णय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आम्हाला सांगितलं सगळ्यांनी वानखेडेला शपथविधीला जा.. आम्ही सगळेजण शपथविधीला गेलो. नरेंद्र मोदी साहेब मला ओळखतात.. मी त्यांना ओळखतो. त्यामुळे ते म्हणाले अजितजी कैसे हो.. साहब की कैसी है तबियत.. ते बाकीच्यांशी पण बोलले.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘जर आपल्याला त्यांच्यासोबत जायचं नव्हतं तर आम्हाला का पाठवलं होतं तिथे. त्यानंतर पुन्हा काही घडलं त्या खोलात मी जात नाही.’ असं अजित पवार म्हणाले.

‘…तर पवाराची अवलाद सांगणार नाही!’

‘2017 ला पुन्हा प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार आणि बाकीचे सर्व.. त्यावेळेस वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. वरिष्ठांनी सांगितलं… माझ्याकडून मी.. जयंत पाटील, सुनील तटकरे.. त्यामध्ये समोरून देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि चंद्रकांतदादा हे होते.’

ADVERTISEMENT

‘कुठली खाती, कुठली पालकमंत्री पदं सगळं ठरलं होतं.. मी कधीही महाराष्ट्राला खोटं बोलणार नाही. खोटं बोललो तर पवाराची अवलाद सांगणार नाही.. त्यामध्ये ते ठरलं.. आम्हाला निरोप आला.. सुनील तटकरेंना दिल्लीला बोलवलं. दिल्लीला त्यांच्या वरिष्ठांच्या बरोबर आपले वरिष्ठ आणि सुनील तटकरेंची बैठक झाली.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> ‘अजित पवारांचं नाणं खोटं म्हणून माझा फोटो लावला’, शरद पवारांचा पहिला हल्ला

‘त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं की, शिवसेना हा आमचा 25 वर्ष जुना मित्रपक्ष आहे. आम्ही त्याला सोडणार नाही. ते म्हणाले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असं सरकार राहील. आपल्या वरिष्ठांना ते मंजूर नव्हतं. ते म्हणाले शिवसेना चालत नाही आम्हाला.. शिवसेना जातीयवादी आहे.. आणि ते बारगळलं तिथलं.’ असा प्रचंड गौप्यस्फोट यावेळी अजित पवार यांनी केला आहे.

‘2019 ला शरद पवार आणि भाजप नेत्यांची उद्योगपतीच्या घरी झालेली बैठक’

‘त्यानंतर 2019 आलं विधानसभा निवडणकुचे निकाल आले. निकालानंतर परिस्थिती काय होती ते तुम्हाला माहिती आहे. त्यामध्ये मोठ्या उद्योगपतीच्या घरी.. आपले वरिष्ठ नेते, प्रफुल पटेल उद्योगपती.. भाजपचे वरिष्ठ नेते, मी आणि देवेंद्र फडणवीस सगळी चर्चा झाली. पाच बैठका झाल्या. त्याच बंगल्यात. मला आणि देवेंद्रला सांगितलं की, कुठं बोलायचं नाही. आता मला सांगा नेत्यांनी सांगितल्यावर मी कुठे बोलेन. मी नाही बोललो..’

‘त्यानंतरचा घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे. अनेकदा मीडिया मला विचारतं. 2019 ला नेमकं काय झालं.. परंतु मला कोणाला बदनाम होऊ द्यायचं नाही. त्यावेळेस हे सगळं चालू असताना अचानक बदल झाला आणि सांगितलं की, आपण शिवसेनेसोबत जायचं..’

हे ही वाचा>> शरद पवार छगन भुजबळांवर बरसले; म्हणाले, “बडवे येऊ देत नाही”

‘मला सांगा 2017 ला शिवसेना जातीयवादी होती. म्हणून त्यांच्या बरोबर नाही जायचं.. असा काय चमत्कार झाला की, दोन वर्षांनी शिवसेना मित्रपक्ष झाला आणि ज्या भाजपसोबत जाणार होतो तो जातीयवादी झाला. असं नाही चालत..’

‘हे सगळं होतं असताना इथे एक वेगळी भूमिका तिथे एक वेगळी भूमिका.. त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार आलं. मला वरिष्ठांनी आणि आमदारांनी उपमुख्यमंत्री बनवलं. मी कधी हू की चू होऊ दिलं नाही.’ असं म्हणत सगळे राजकीय डावपेच हे शरद पवारच रचत असल्याचं शरद पवार म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT