उर्दू साहित्य अकादमीचं कवी संमेलन.. फडणवीस सरकारकडून 15 लाख रुपये, गेट वे ऑफ इंडियावर सोहळा
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या वतीने एका कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यासाठी सरकारने 15 लाख रुपयांचे अनुदान देण्याच्या निर्णयास मान्यता दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रजासत्ताक दिनी गेट वे ऑफ इंडियावर महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचं कवी संमेलन
सरकारकडून कवी संमेलनाला 15 लाख रुपयांचं अनुदान
अनुदानासाठी शासनाकडून पत्रकही जारी
मुंबई: महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीला फडणवीस सरकारकडून कवी संमेलनासाठी 15 लाख रूपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी उर्दू साहित्य अकादमीला 2 कोटी रुपये अनुदान हे मंजूर झालं आहे. त्यापैकी आता 15 लाख रुपयांच्या अनुदानाच्या निर्णयाला सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. याबाबत शासनाकडून अधिकृत पत्रकही जारी करण्यात आलं आहे. (fadnavis government grants rs 15 lakh grant to urdu sahitya akademi poets conference event at gateway of india)
26 जानेवारी 2025 रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या वतीने कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहेत. याच कार्यक्रमासाठी सरकारने 15 लाख रुपये इतक्या रकमेचे अनुदान वितरीत करण्याचा निर्णयाला शासनाने आज (24 जानेवारी) परिपत्रक काढून मान्यता दिली आहे.
हे ही वाचा>> प्रताप सरनाईकांचा बंगला भाजपच्या राज्यमंत्र्याना! सरकारी बंगला काढला की बदलून दिला? महायुतीत चाललंय तरी काय?
उर्दू साहित्य अकादमीच्या कवी संमेलनाला 15 लाख रुपये, पाहा शासन निर्णय जसच्या तसा...
शासन निर्णय :-
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता मंजूर असलेल्या अनुदानापैकी एप्रिल ते डिसेंबर २०२४ या ९ महिन्यांकरिता उपरोक्त संदर्भ क्रमांक २ येथील शासन निर्णयान्वये ६०% च्या मर्यादेत महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत विविध कार्यक्रम राबविण्यासाठी रुपये ८९.०० लाख (अक्षरी रुपये एकोणनव्वद लाख फक्त) इतके अनुदान या कालावधीत खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.









