”गौतमी पाटील बैलासमोर नाचो, नाहीतर…”, अजित पवारांची तुफान फटकेबाजी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ajit Pawar Reaction on Gautami Patil
Ajit Pawar Reaction on Gautami Patil
social share
google news

Ajit Pawar Reaction on Gautami Patil : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडिओत ती बैलासमोर नाचताना दिसली होती. या घटनेवरून अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावर तुला काही वाईट वाटलं असा सवालच त्यांनी पत्रकारांना केला. तसेच ती बैलासमोर नाचेल किंवा आणखीण कोणासमोर नाचेल, तुला काय त्रास होतोय, अशा शब्दात अजित पवारांनी (Ajit Pawar) फटकेबाजी केली होती. (gautami patil dance front of bull ajit pawar reaction)

बैल काय गाईसमोर नाचू देत तिचा तो अधिकार आहे. हाच गौतमीचा व्यवसाय आणि उपजिविकेचे साधन देखील आहे. कला आणि अभिनयाच्या माध्यमातून ती त्याच्याकडे बघते.आता हे सगळ बघत असताना माझं लहान बाळाचे बारसं आहे आणि त्याला अजून काहीच कळत नाही, तरी देखील बारशाच्या निमित्ताने बोलावलंय तर तिला नाचावचं लागेल. मग बैलाचा वाढदिवस असो किंवा बैलपोळाच्या शर्यतीत बैलगाडा पहिला आला असो, तिचे ते कामच आहे, असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा : ‘दिल्लीतील सैतान आदेश देतायेत, उद्या हॅन्डग्रेनेडही फेकतील..’,बारसूवरून राऊत आक्रमक

राज्यात उरूस, जत्रा सुरु आहेत,यासाठी ग्रामीण भागात करमणूकीसाठी तमाशे बोलवले जातायत. त्यात आता हे नाव सध्या चर्चेत आहे, त्यामुळे मी गौतमी पाटीलला बोलावण्यासाठी अनेकांना सुचवले होते, अशी कबुली देखील त्यांनी यावेळी दिली होती. जर त्यांना सुपारी परवडत असेल तर त्यांनी नक्की बोलवावे असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रकरण काय?

पुण्याच्या मुळशीत विवाहच्या हळदी कार्यक्रमानिमित्त नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण हा कार्यक्रम चक्क एका बैलाच्या समोर सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी बावऱ्या बैल गौतमीच्या स्टेजच्या समोर बांधला होता आणि त्यापुढे गौतमी नृत्य सादर करत होती. मुळशीतील सुशील राजाभाऊ हगवणे युवा मंच बावऱ्या फॅन्स क्लबने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

हे ही वाचा : बारसूच्या राड्यावर मुख्यमंत्री म्हणाले.. हे तर सर्वसामान्यांचं सरकार… अन्याय करणार नाही!

गौतमीचा माफीनामा

दरम्यान याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित न करण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते. इतकंच नाही, तर त्यांनी अधिवेशनातही हा मुद्दा मांडणार असल्याचं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर गौतमी पाटीलने हात जोडत अजित पवारांची माफी मागितली.“दादा खूप मोठे आहेत. दादा मी काही बोलू शकत नाही. दादांना माझं एकच म्हणणं आहे की, मी चुकले, तेव्हा माफी मागितली होती. माझ्याकडून चुका झाल्या होत्या. मी माफी मागितली, तरीही काहीजण मला ट्रोल करतात. ते कोण हे मला माहिती नाहीये”, असं म्हणत तिने माफी मागितली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT