पवारांच्या NCP ला मोठा धक्का, 'तिने' भाजप मंत्र्याच्या पत्नीला हरवलं पण आता गमावलं 'सगळ्यात मोठं' पद

मुंबई तक

भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचं जात वैधता प्रमाणपत्र अपात्र ठरल्यानंतर आता त्यासंबंधी शासन आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गायत्री यांना नगराध्यक्ष पद गमवावं लागलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मनीष जोग, जळगाव: भुसावळ येथील लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर आता त्या अपात्र झाल्या असून याबाबतचे शासकीय आदेश जारी करण्यात आले आहेत. हा गायत्री भंगाळे यांच्यासोबतच भुसावळमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला देखील मोठा धक्का मानला जात आहे. 

नेमकं प्रकरण काय?

गायत्री गौर-भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेऊन तक्रारी करण्यात आल्या होत्या. यावर चौकशी होऊन काही दिवसांपूर्वीच त्यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा महत्वाचा निकाल जात पडताळणी समितीच्या वतीने देण्यात आला होता. यामुळे त्या नगराध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याचे संकेत मिळाले होते. आणि शासनाच्या वतीने हाच आदेश जारी करण्यात आला आहे.

हे ही वाचा>> महाराष्ट्र आता थांबणार नाही, मंत्रिमंडळ बैठकीतील 7 धडाकेबाज निर्णय

भाजप मंत्र्याच्या पत्नीचा केलेला पराभव, पण..

अलीकडेच झालेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भुसावळचे नगराध्यक्षपद हे अनुसुचित जाती महिला या प्रवर्गासाठी राखीव होते. यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने गायत्री गौर-भंगाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला होता. आपल्या अर्जासोबत त्यांनी आपण एस.सी. प्रवर्गातील असल्याचे भुसावळच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र सादर केले होते. या निवडणुकीत त्यांनी मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनीताई सावकारे यांचा धक्कादायक पराभव केला होता.

हे ही वाचा>> मला उभा चिरला तरी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही, खासदार फुटणार असल्याच्या बातम्या पाहून अरविंद सावंत संतापले

मात्र, असं असून देखील आता गायत्री भंगाळे यांनाच आपलं नगराध्यक्ष पद हे गमवावं लागलं आहे.

हे वाचलं का?