'पोरींनी तोपर्यंत तोंड काळं केलेलं असतं..', 'या' महाराजाने पातळीच सोडली, तरुणींबाबत नको ते बोलला!
Aniruddhacharya Viral News : कथावाचक अनिरुद्धाचार्य महाराज गेल्या काही दिवसांपासून समाजवादी पार्टी (सपा) च्या निशाण्यावर आहेत. अखिलेश यादव यांच्यासोबत वाद झाल्यानंतर त्यांचा आणखी एक खळबळजनक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुलींबाबत अनिरुद्धाचार्यांचं खळबळजनक विधान
सपा आणि अनिरुद्धाचार्य यांच्यात जुना वाद
समाजवादी पार्टीने केला विरोध
Aniruddhacharya Viral News: कथावाचक अनिरुद्धाचार्य महाराज गेल्या काही दिवसांपासून समाजवादी पार्टी (सपा) च्या निशाण्यावर आहेत. अखिलेश यादव यांच्यासोबत वाद झाल्यानंतर त्यांचा आणखी एक खळबळजनक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत अनिरुद्धाचार्य यांनी मुलींच्या लग्नाचं वय आणि त्यांच्या चारीत्र्यावर अशोभनीय विधान केलं आहे.
समाजवादी पार्टीचे खासदार घोसीचे खासदार राजीव राय यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल केला. या व्हिडीओत अनिरुद्धाचार्य यांनी मुलींचं लग्नाचं वय कमी करण्याबाबत संतापजनक वक्तव्य केलं."आता आम्ही लग्न करून 25 वर्षांच्या मुली आणतो. 25 वर्ष होईपर्यंत मुलीने चार ठिकाणी तोंड काळं केलेलं असतं. तारुण्यात चुकीच्या वळणावर पोहोचलेल्या असतात.''
समाजवादी पार्टीने केला विरोध
भारतीय कायद्यान्वये, मुलींच्या लग्नाचं कायदेशीर वय 18 वर्ष आणि मुलांचं 21 वर्ष आहे. बालविवाह करणं कायदेशीर गुन्हा आहे. एवढंच नाही, बालविवाह निषेध संशोधन 2021 मध्ये मुलींच्या लग्नाचं वय 18 ने वाढवून 21 करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला होता. पण त्या अजून मंजुरी मिळाली नाही. अशातच अनिरुद्धाचार्य यांच्या विधानामुळे समाजवादी पार्टीने कठोर पाऊल उचललं आहे.
हे ही वाचा >> पैसा पाणी : ट्रम्प यांच्या धमकीमुळे पेट्रोल महागणार?
खासदार राजीव रायने या विधानाचा निषेध करून महिला आयोग, महिला बाल विकास मंत्रालय आणि उत्तर पोलीसांना यावर कारवाई करण्याची मागणी केलीय. त्यांनी प्रश्न उपस्थित केले की, आमच्या बहिणींना असे लोक चारित्र्याचा प्रमाणपत्र देणार? जर कारवाई केली नाही. तर आपल्या देशात असे संस्कार आहेत?










