‘त्यांना सरकार बोलायला भाग पाडतंय’, मनोज जरांगेंचं ओबीसी नेत्यांबद्दल स्फोटक विधान
राजकीय नेते आणि मंत्री स्वतःच्या स्वार्थासाठी जर एकत्र येत असतील तर आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र येणं गरजेचं असल्याचे सांगत त्यांनी सरकारला आता एक मिनिटही वेळ देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन छेडले आहे. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट इशारा दिला आहे. आरक्षणासाठी (Maratha Reservation) जी समिती नेमली होती, त्या समितीलाही आता जरांगे पाटील यांनी वेळ देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनची पुढची दिशा आता काय ठरणार आणि त्यासाठी सरकार (government of maharashtra) आता काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT
सरकार बोलण्यास भाग पाडते
मनोज जरांगे पाटील यांनी धनगर आरक्षणाविषयी बोलतानाही त्यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे म्हणून ओबीसी समाजाची कोणतीही हरकत नाही मात्र त्यांचे नेते बोलतात. त्यांचीही बोलण्याची इच्छाही नाही परंतु सरकार त्यांना बोलण्यास भाग पाडत असल्याचा त्यांनी गंभीर टीकाही केली आहे.
मंत्री स्वार्थासाठी एकत्र
मनोज जरांगे पाटील सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, मंत्री जर स्वार्थासाठी एकत्र येऊ शकतात. तर मुलांच्या भविष्यासाठी समाज का एकत्र येऊ शकत नाही असा सवालही त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> ‘गोपीनाथ मुंडे स्मारक आता बनवू नका’; पंकजा मुंडे भडकल्या, मेळाव्यातून भाजपवर तोफ
मुलांच्या वाट्याला दुःख
धनगर आणि मराठा समाज एकत्र येऊन लढा उभारण्यासाठी कोणाचीही काहीच हरकत नाही. कारण आरक्षणामुळे काय तोटा झाला आहे ते आपल्याला माहिती आहे. आपल्या वाट्याला आलेलं दुःख आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठीच हे प्रयत्न असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.
समितीलाही वेळ नाही
मनोज जरांगे पाटील यांनी आज सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारने दिलेली मुदत आता संपली आहे. त्यातच आरक्षणाबाबत जी समिती नेमली होती. त्या समितीनेही वेळ मागितला होता. मात्र त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ देण्यास नकार दिला आहे. तसेच सरकारला आता एक मिनिटही वेळ देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ‘गोपीनाथ मुंडे स्मारक आता बनवू नका’; पंकजा मुंडे भडकल्या, मेळाव्यातून भाजपवर तोफ
मुलांच्या भविष्याचा प्रश्न
सरकारने आज संध्याकाळपर्यंत दिलेला शब्द पाळावा अन्यथा उद्यापासून उपोषण सुरू करणार असल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे. या सरकारने अनेक वर्षे वेळ घेतला, मात्र मराठा समाजाबरोबर धनगर समाजालाही आरक्षण दिले पाहिजे. कारण या दोन्ही समाजाच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने वेळ काढून सरकारला जेरीस अणू वेळ पडल्यास मराठा समाज आणि धनगर समाज एकत्र येऊ असाही त्यांनी इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT