Pune : गुंड गजा मारणे सपत्नीक पार्थ पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ?

ADVERTISEMENT

Gund Gaja Marne meeting with Parth Pawar wife great excitement in the political circle
Gund Gaja Marne meeting with Parth Pawar wife great excitement in the political circle
social share
google news

Pune News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) चर्चा सुरु असतानाच आणि राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अनेक राजकीय घडामोडींना वेगही आला आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवारही आता अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवारांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, कार्यक्रमांना हजेरी लावल्याने त्यांची जोरदार चर्चाही सुरु होती. त्यातच पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे (Gaja Marane) आणि त्यांच्या पत्नीने पार्थ पवार (Parth Pawar) यांची भेट घेतली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गजा मारणे याच्यावर खून, खंडणी, दहशत पसरवणे या प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. तसेच यापूर्वी अनेकदा त्याच्यावर मोक्का कारवाईदेखील करण्यात आली होती. त्यामुळे पुण्यातील सराईत गुंडांमध्ये गजा मारणेचे नाव घेतले जाते.

हे ही वाचा >> ‘त्या’ मिरवणुकीवर दगडफेक होताच मीरा रोड चर्चेत का? ATS च्या रडावरही हाच परिसर का?

पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भेट

गजा मारणे याने पार्थ पवार यांची भेट घेताना त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रदीप देशमुख हे पदाधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे गजा मारणे आणि पार्थ पवारच्या भेटीमुळे ज्या प्रमाणे राजकीय वर्तुळासह पोलीस दलातही या घटनेची जोरदार चर्चा केली जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मोहोळची पत्नीही भाजपमध्ये

पुण्यात गुंड शरद मोहोळची हत्या झाल्यानंतरही मोठी खळबळ उडाली होती. तर त्याआधी शरद मोहळची पत्नी स्वाती मोहोळ भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यावेळीही त्यांची जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर आता गजा मारणे अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारांच्या भेटीला गेल्यामुळे गजा मारणेही अजित पवार गटात प्रवेश करणार का अशी चर्चा केली जात आहे.

नेमकं कारण अस्पष्ट

गजा मारणे आणि पत्नीने पार्थ पवारांची भेट घेतली असली तरी या भेटीबाबत अजून काही गोष्टी स्पष्ट झाल्या नाहीत. मात्र राजकीय वर्तुळात या भेटीचे नेमकं कारण काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘माकडांमुळे आत्महत्या करु…’, सरकारलाच दिली धमकी; हे भलंतच प्रकरण आहे तरी काय?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT