मोदी सरकारला दररोज नवनवे धक्के देण्याचं राहुल गांधींचं प्लॅनिंग, पाहा आज काय सुरुय!
दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि INDIA आघाडीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने पायी मोर्चा सुरू केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राजधानी दिल्लीमध्ये INDIA आघाडीचा एल्गार
सुप्रीम कोर्टापर्यंत विरोधकांचा पायी मोर्चा
राहुल गांधींचा सुप्रीम कोर्टावर धडक मोर्चा! ज्ञानेश कुमारांविरोधात घोषणाबाजी
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत INDIA आघाडीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने पायी मोर्चा सुरू केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह आघाडीचे आठ नेते सर्वोच्च न्यायालयात पोहोचून वैयक्तिकरीत्या याचिका दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मोर्चात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादवही सहभागी झाले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सहा मेट्रो स्थानकांचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे दरवाजे तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.
राहुल गांधींसह आठ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे
दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथून INDIA आघाडीच्या खासदारांच्या मोर्चाला सुरुवात झाली. राहुल गांधी यांच्यासह आठ नेते सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने पायी निघाले आहेत. हे नेते न्यायालयात पोहोचल्यानंतर वैयक्तिकरीत्या याचिका दाखल करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
हे ही वाचा>> 'तुम्हाला मी आज इशारा देतो, जर...', CM फडणवीस राहुल गांधींवर आता एवढे का संतापले?
या मोर्चात सहभागी होण्यासाठी देशाच्या विविध भागांतून काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीत दाखल झाले आहेत. बाराखंभा रोड परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले असून, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर परिसरात सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.
सरन्यायाधीशांनी अर्ज फेटाळला, तरी मोर्चा सुरू
मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी INDIA आघाडीच्या खासदारांनी भेट नाकारल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही काँग्रेसने मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
