पतीकडून गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या DNA टेस्टचा आग्रह, गरोदर महिलेचं भयंकर पाऊल
Crime News : तेलंगणातील मेडक जिल्ह्यात पतीकडून पत्नीच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या डीएनए चाचणीचा आग्रह धरला जात असल्याच्या आरोपानंतर पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केली. या प्रकरणी पती आणि सासूला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या DNA टेस्टचा आग्रह
गरोदर महिलेचं भयंकर पाऊल
Crime News : तेलंगणातील मेडक जिल्ह्यात पतीकडून पत्नीच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या पितृत्वाबाबत संशय घेतला जात असल्याच्या आरोपानंतर एका 23 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जी सुष्मिता असे या महिलेचे नाव असून, तिच्या कुटुंबीयांनी पती जी अभिलाष याच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. सुष्मिता पाच महिन्यांची गर्भवती होती. तिच्या पतीकडून बाळाच्या पितृत्वाची खात्री करण्यासाठी डीएनए चाचणी करण्याचा आग्रह धरला जात होता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती आणि सासूला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : भाजपच्या माजी आमदाराची 70 ते 80 जणांकडून हत्या, संतापलेला जमाव अन्... नेमकं घडलं तरी काय?
गरोदर महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप
जी सुष्मिता हिचा विवाह सुमारे 18 महिन्यांपूर्वी गादिपेड्डापुर गावातील जी अभिलाष याच्याशी झाला होता. सुष्मिताची आई जनाबाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अभिलाष पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. तसेच तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अभिलाषची आई शशिरेखा हिच्याकडूनही सुष्मिताला त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या सततच्या त्रासामुळे सुष्मिता मानसिक तणावाखाली होती, असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : भाजपच्या माजी आमदाराची 70 ते 80 जणांकडून हत्या, संतापलेला जमाव अन्... नेमकं घडलं तरी काय?
