दोन्ही ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल, मुंबई पोलिसांनी लावली कोणकोणती कलमं?
मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, संदीप देशपांडे, वरुण सरदेसाई आणि महेश सावंत यांच्यासह 25 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT

दिपेश त्रिपाठी, मुंबई: मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क येथे झालेल्या आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आंदोलनादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याचा आणि परवानगीशिवाय आंदोलन केल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी 25 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये शिवसेना (UBT)पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, संदीप देशपांडे, वरुण सरदेसाई आणि महेश सावंत यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा
शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आंदोलनात सहभागी झालेल्या 25 जणांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. या यादीत ठाकरे कुटुंबातील दोन महत्त्वाच्या राजकीय नेत्यांची नावे असल्याने या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा>> शिवसेना भवनाबाहेर राडा, आदित्य आणि तेजस ठाकरे मैदानात
शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे यांच्यासह संदीप देशपांडे, वरुण सरदेसाई आणि महेश सावंत यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कोणत्या कलमांनुसार गुन्हा दाखल?
पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार कलमे लावली आहेत. उपलब्ध माहितीनुसार, गुन्ह्यात पुढील कलमांचा समावेश आहे.
