उद्धव ठाकरेंचे मेहुणे पुन्हा अडचणीत, आता कोणती कारवाई?

मुंबई तक

ADVERTISEMENT

it raid on pushpak billion case udhhav thackeray brother in law shridhar patankar problem increase
it raid on pushpak billion case udhhav thackeray brother in law shridhar patankar problem increase
social share
google news

पुष्पक बुलियन प्रकरणात आज आयकर विभागाने मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, कोलकत्ता या चार ठिकाणी छापेमारी करून तपास सुरु केला आहे. या छापेमारीमुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अर्थात रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण पुष्पक बुलियन प्रकरणातील आरोपी नंदकिशोर चर्तुर्वेदी याने पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती संस्थेत शेल कंपन्याच्या माध्यमातून पेसै ट्रान्सफर केले होते. या पैशातून पाटणकर यांनी काही फ्लॅटस खरेदी केल्याचा संशय होता.त्यामुळे ईडीने 2022 रोजी कारवाई करून 11 फ्लॅट, 7 कोटी ही प्रॉपर्टी प्रोविजनली अटॅच केली होती. त्यात आता पुष्पक बुलियन प्रकरणात पुन्हा एकदा आयकर विभागाने छापेमारी सुरू केल्याने श्रीधर पाटणकरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (it raid on pushpak billion case udhhav thackeray brother in law shridhar patankar problem increase)

ADVERTISEMENT

नंदकिशोर चतुर्वेदी हा हवाला ऑपरेटर आहे. चतुर्वेदी याचे पहिल्यांदा नाव पुप्षक बुलियन केस प्रकरणात समोर आले होते. नंदकिशोर चतुर्वेदी यांनी मोठ्या प्रमाणात हमसफर डिलर प्रायव्हेट कंपनी मार्गे साईबाबा गृहनिर्मिती संस्था या कंपनीमध्ये पैसै गुंतवले होते. ही कंपनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अर्थात पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांची होती. या कंपनीत नंदकिशोरने 20 ते 30 कोटी गुंतवल्याची माहिती होती.त्यामुळे 2022 साली ईडीने श्रीधऱ पाटणकर यांच्यावर कारवाई करून त्यांचे 11 फ्लॅट, 7 कोटी प्रॉपर्टी प्रोविजनली अटॅच केली होती. पुष्पक बुलियन प्रकरणातील नंदकिशोर चतुर्वेदी यांनी साईबाबा गृहनिर्मिती संस्था या कंपनीमध्ये पैसै गुंतवले होते. या पैशातून पाटणकर यांनी ही संपूर्ण प्रॉपर्टी खरेदी केली होती, असे ईडीच्या चौकशी रिपोर्टमधून देखील स्पष्ट सांगण्यात आले होते.

हे ही वाचा : मुंबईतील उच्चभ्रू परिसरात तरूणीचा विवस्त्र मृतदेह, अजित पवार सरकारवर खवळले

दरम्यान आज आय़कर विभाshridhar patankarगाने पुन्हा एकदा कारवाईचा फार्स आवळत छापेमारी सूरू केली होती. त्यानुसार आज आयकर विभागाने मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, कोलकत्ता या चारही ठिकाणी छापेमारी केली. ही छापेमारी सकाळपासून सुरु आहे. आता चार ठिकाणी टाकलेली छापेमारी अद्याप पुर्ण झाली नाही आहे, त्यामुळे त्याबाबतचा तपशील अद्याप समोर आला नाही. पण आता छापेमारीतून काय माहिती समोर येते? श्रीधर पाटणकर यांच्या अडचणी वाढणार का? याबाबत लवकरच स्पष्टता येणार आहे.

हे वाचलं का?

तसेच नंदकिशोर चर्तुर्वेदी हा फरार आहे. त्यानंतर ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या तीनही विभागाच्या टीम त्याचा शोध घेत आहे,मात्र नंदकिशोर चर्तुर्वेदी बाबत कुठलीही माहिती अद्याप मिळू शकली नाही आहे.

हे ही वाचा :  शरद पवार संतापले, PM मोदींवर बरसले; महाविकास आघाडीलाही सुनावलं..

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT