'महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या कृतघ्न मुलाने... ', पार्थ पवारांवर काँग्रेस चिडली! बरंच काही बोलले!
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती. त्याच टीकेला महाराष्ट्र काँग्रेसने आता प्रत्युत्तर दिलं आहे. पाहा काँग्रेसने नेमकं काय केलंय ट्वीट.
ADVERTISEMENT

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेनंतर आता काँग्रेसकडून देखील पार्थ पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून (INCMaharashtra) प्रसिद्ध केलेल्या ट्विटमध्ये पार्थ पवार यांच्या ‘काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल’बद्दलच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसने पार्थ पवार यांना ‘धड भाषणही देता न येणारे’, ‘कुटुंबीयांच्या पूर्वपुण्याईवर नुकतेच खासदार झालेले’ आणि ‘कृतघ्न मुलगा’ म्हणत त्यांच्यावर व्यक्तिगत आणि राजकीय स्तरावर हल्ला चढवला आहे.
काँग्रेसकडून पार्थ पवारांवर जोरदार हल्ला, नेमकं ट्वीट काय?
'धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं?'
'स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील.'
हे ही वाचा>> सूनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण आहेत?
'या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे?' अशा स्वरुपाचं ट्वीट करत काँग्रेसने पार्थ पवारांना लक्ष्य केलं.









