Jitendra Awhad : "मग, दोष एकनाथ शिंदेंना कशाला द्यायचा?", आव्हाडांचे अजित पवारांवर टीकेचे 'बाण'

मुंबई तक

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करत जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले. 

ADVERTISEMENT

जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक केले.
जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांवर जितेंद्र आव्हाडांचा निशाणा

point

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय बोलले?

point

जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टची चर्चा

Jitendra Awhad Ajit Pawar Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना उल्लेख न करता सुनावले आहे. आव्हाडांनी एकीकडे अजित पवारांवर बाण डागले आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. (MLA Jitendra Awhad praised Chief Minister Eknath Shinde, but criticized Ajit Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पत्रकारांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याच कार्यक्रमाचा संदर्भ देत जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट लिहिली आहे. 

अजित पवारांना टोले; जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

"परवा महायुतीतील एका मोठ्या नेत्याने पत्रकारांना जेवण दिले. यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये, मुख्यमंत्री पैसे खर्च करून निवडणुका जिंकत आहेत, असा आरोप करीत सरकारच्या माध्यमातून विविध योजना जाहीर करायला लावतात. मात्र, त्यासाठी पैशांची उपलब्धता होत नाही. दिल्लीतील एक दिवसाच्या वास्तव्यात आपण भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना हे सांगिल्याचे समजते तसेच अनेक विवादस्पद मुद्दे त्यांनी पत्रकारांशी अनौपचारीक रित्या शेयर केले."

हेही वाचा >> ठाकरेंचं ठरलं! विधानसभेला 'इतक्या' जागा लढणार?

शिंदेंचे जितेंद्र आव्हाडांनी केले कौतुक

"मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक सांगू शकतो की, हा माणूस जेवढे पैसे कमवत असेल-नसेल, याबद्दल मला काही बोलायचे नाही. पण, जे पैसे त्यांच्या हातात येतात; ते पैसे मोकळेपणाने वाटायला एकनाथ शिंदे कधीच मागेपुढे पहात नाहीत, हे ! १९९७ -९८ पासून पहातोय. जेव्हा त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. आजही ते तसेच करतात, हे त्यांच्या मित्रपरिवाराशी चर्चा केल्यावर दिसते."

हे वाचलं का?

    follow whatsapp