Maharashtra vidhan sabha : ठाकरेंचं ठरलं! विधानसभेला 'इतक्या' जागा लढणार?
Vidhan Sabha election Uddhav Thackeray : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले असून, उद्धव ठाकरेंची शिवसेनाही कामाला लागली आहे. उद्धव ठाकरे यांची महत्त्वाच्या नेत्यांसोबत रणनीतीवर चर्चा झाली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
उद्धव ठाकरे लागले विधानसभा निवडणुकीच्या तयारीला
शिवसेना (युबीटी) नेत्यांसोबत उद्धव ठाकरेंची बैठक पार पडली
शिवसेनेची (युबीटी) विधानसभा निवडणुकीसाठी तयारी काय?
Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवायच्या? निवडणुकीसाठी काय रणनीती असायला हवी? याबद्दल उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा केली. मुंबईतील बीकेसीतील ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीत काय चर्चा झाली, याबद्दल माहिती समोर आली आहे. (Shiv Sena led by Uddhav Thackeray is aiming to contest on nearly 115 to 125 assembly constituencies in Maha Vikas Aghadi (MVA) alliance)
ADVERTISEMENT
लोकसभेनंतर राज्यातील सर्व राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनीही विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले असून, यासंदर्भातील पहिली बैठक पार पडली.
हेही वाचा >> "कुणी काय केलं सगळं माहितीये", क्रॉस व्होटिंगवर आमदाराने सोडलं मौन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील बीकेसी परिसरात असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, सुभाष देसाई, सुनील प्रभू आणि राजन विचारे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय रणनीती ठरवण्यावर चर्चा झाली.
हे वाचलं का?
महाविकास आघाडीत ठाकरेंची शिवसेना किती जागा लढवणार?
उद्धव ठाकरेंची शिवसेना विधानसभा निवडणुकीत 115 ते 125 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी 115 ते 125 जागा मिळवण्याची प्रयत्न ठाकरेंची शिवसेनेचा आहे.
विधानसभेसाठी 'वॉर रुम' आणि 'थिंक टँक'
मंगळवारी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सर्व 125 जागांचा आढावा घेतला. ज्या मतदारसंघावर लक्ष्य आहे, त्या प्रत्येक मतदारसंघासाठी वॉर रुम आणि थिंक टँक उभी करण्याचे नियोजन उद्धव ठाकरे यांचे आहे. त्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> पूजा खेडकरांना मोठा दणका, नोकरी जाणार?
मविआमध्ये ठाकरे कोणत्या आधारावर मागणार 125 जागा?
विधानसभेच्या जागावाटपावेळी उद्धव ठाकरे 125 जागांची मागणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या वेळी मिळालेल्या मताधिक्याच्या आधारे ठाकरे या जागा मागणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेने या 125 विधानसभा मतदारसंघाची वर्गवारीही केली आहे. यात अ, ब आणि क अशी विभागणी केलेली आहे.
ADVERTISEMENT
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला या मतदारसंघात मिळालेल्या मतांच्या आधारे या मतदारसंघाची विभागणी करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT