Ranjit Savarkar : पुस्तकातील ‘त्या’ दाव्यावर आव्हाड भडकले, ‘नथुरामी प्रवृत्तीला ठेचून…’

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

jitendra awhad reaction on ranjit savarkar book make sure gandhi is dead gandhiji was not killed by nathuram godse bullet
jitendra awhad reaction on ranjit savarkar book make sure gandhi is dead gandhiji was not killed by nathuram godse bullet
social share
google news

Jitendra Awhad Reaction on Ranjit Sawarkar Book : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी लिहलेल्या ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकात “महात्मा गांधीजींची हत्या ही नथुराम गोडसे याने केलीच नाही”, असा दावा करण्यात आला होता. या दाव्यानंतर एकच खळबळ माजली आहे.त्यात या वादावर विविध माध्यमातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांनी देखील या दाव्यावर संताप व्यक्त केला आहे. (jitendra awhad reaction on ranjit savarkar book make sure gandhi is dead gandhiji was not killed by nathuram godse bullet)

जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुस्तकातील या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी या दाव्याचा निषेध करत, नथुरामी प्रवृत्तीला ठेचून काढावे, एवढीच अपेक्षा व्यक्त केली आहे.

आव्हाडांचे ट्विट जसेच्या तसे

महात्मा गांधीजींच्या खुनाबाबत संशय निर्माण करणारे पुस्तक आज दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाच्या माध्यमातून, “महात्मा गांधीजींची हत्या ही नथुराम गोडसे याने केलीच नाही” , असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानंतर या पुस्तकात जे काही लिहिलय, त्याकडे पाहिल्यास पुस्तक लिहिणाऱ्या रणजित सावरकर मानसिक संतुलन ढळले आहे, हेच स्पष्ट दिसून येत आहे. खून झाला तेव्हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते; खुनाचा योग्य तपास झाला अन् योग्य सुनावणी झाली. त्यानंतर नथुरामला फाशीची शिक्षा सुनावून त्याला फासावर चढवण्यात आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Lok Sabha 2024 Opinion Poll : भाजप, काँग्रेस की आप… कोण मारणार बाजी?

नथुराम हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आणि काळा डाग आहे. तो डाग आणि त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी काही मंडळी आता पुढे येत आहेत. दुर्देवं हेच आहे की, हे पुस्तक मराठी माणसानेच लिहिलेले आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो. महाराष्ट्राने आता तरी जाग व्हावे आणि या नथुरामी प्रवृत्तीला ठेचून काढावे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.

ADVERTISEMENT

पुस्तकात नेमकं काय लिहलंय?

महात्मा गांधींवर नथुराम गोडसेने गोळी चालवली नाही. महात्मा गांधी यांच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या वेगळ्या दिशेने आल्या होत्या. ज्या गोळीने महात्मा गांधी यांचा मृत्यू झाला ती गोळी नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून आलेली नव्हती असा मोठा दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे. नथुरामांच्या गोळ्यांनी गांधीचा मृत्यू झाला नाही. कर्नल तनेजा यांनी काळजीपूर्वक अहवाल बनवला आहे. नथुराम गोडसेचा समज झाला की मीच गोळ्या मारल्या पण खऱ्या गोळ्या इतरांनी मारल्या होत्या. तिथे २०० लोक होते. तिथे सुरक्षा व्यवस्था होती. माझं सरकारला आवाहन त्यांनी एक आयोग नेमावा. आणि गांधी हत्येचे पुरावे दडपण्यात आले आहेत, त्याची चौकशी सूरू करावी, अशी मागणी देखील रणजित सावरकर यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Uddhav Thackeray : नार्वेकरांच्या निवडीवर ठाकरे कडाडले, ‘लोकशाही संपवण्याच्या दिशेने…’

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT