Assembly Election Date Announcement Live : जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख ठरली! 'या' तारखेला होणार मतदान
Maharashtra Live News : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स तसंच हवामानाचा अंदाज 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या सर्व फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
Maharashtra breaking news in marathi : राज्यभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. यामुळे कुठे साखर तर कुठे पेढे वाटून जल्लोष करण्यात येत आहे. लाभार्थी महिलांनी महायुती सरकारचे अभिनंदन केले आहे. दुसरीकडे या योजनेच्या प्रसिद्धीसाठीही राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक होणार आहे.
ADVERTISEMENT
निवडणूक आयोग आज दुपारी 3 वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. ज्यात जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. याशिवाय, हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखाही आज जाहीर होऊ शकतात. तसेच महाराष्ट्रातील निवडणुकीबाबतही निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जम्मू-काश्मीरमधून 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत.
ADVERTISEMENT
- 03:35 PM • 16 Aug 2024
जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीची तारीख ठरली! 'या' तारखेला होणार मतदान
केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु आहे. . या पत्रकार परिषदेत जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित करण्यात आली आहे. तीन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. आणि या निवडणुकीचा निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.
जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये शेवटच्या वेळी 2014 मध्ये निवडणुका झाल्या होत्या.
हरियाणामध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. हरियाणात 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. आणि निकाल 4 ऑक्टोबरला लागणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.
- 02:29 PM • 16 Aug 2024
'या' सिनेमाला मिळाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी कलाकृतींनी विजेत्यांच्या यादीत आपली छाप सोडली आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार 'वाळवी'ला देण्यात आला.
- 12:39 PM • 16 Aug 2024
Maharashtra News : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं धरण भरलं
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं आणि महत्वाचं धरण 82 टक्के भरलं. त्यामुळे अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे 30 सेंटिमीटरने उघडले. सध्या धरणावर विहंगम दुश्य. पर्यटकांची गर्दी व्हायला सुरुवात. वर्धा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
- 12:08 PM • 16 Aug 2024
Uddhav Thackeray : 'CM पदासाठी पवार-चव्हाण जाहीर करतील त्या नावाला...', उद्धव ठाकरेंचं मोठं विधान!
'आजपासून पुढच्या लढाईची सुरूवात होत आहे. आताची लढाई महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची. पृथ्वीराज चव्हाण, पवारांनी CM पदासाठी नाव जाहीर करावं, कोणाच्याही नावाला माझा पाठिंबा आहे. कारण आपल्यात लढाई नको, विरोधकांशी आपल्याला लढायचं आहे. आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा आणि पुढे चला. भाजपसोबत असताना जागांसाठी पाडापाडी व्हायची. त्यांच्यासोबत जे घडलं ते पुन्हा नको. निवडणूक आयोगाने आजच निवडणूक जाहीर करावी. लोकसभेत राजकीय शत्रूला आपण पाणी पाडलं, तू राहशील किंवा मी राहीन अशी लढाई लढा.' असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी मविआच्या निर्धार मेळाव्यात केले.
- 09:16 AM • 16 Aug 2024
Maharashtra News : महाविकास आघाडीचा आज माटुंग्यात पदाधिकारी मेळावा
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवला. आता विधानसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळ आले आहे. त्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवरच आज, माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.
- 09:13 AM • 16 Aug 2024
Maharashtra News : विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाचा तिढा सातव्या दिवशीही कायम आहे.या आंदोलनकर्त्यांची शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांनी भेट घेत चर्चा केली. त्यानंतर आमदार जैस्वाल यांनी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांचीही भेट घेतली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT