लाइव्ह

Maharashtra Breaking News : शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हर्षवर्धन पाटलांचा पक्षप्रवेश सोहळा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra breaking news in marathi : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. आज अनेक राजकीय मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ADVERTISEMENT

तर, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते आज आझाद मैदानात धडक देणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री व्हावं आणि मराठा आरक्षण द्यावं या मागणीसाठी आज मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.

आरे ते बीकेसी मेट्रो स्थानकांचा आजपासून प्रवास सुरू होणार. थोड्या वेळात पहली मेट्रो सुटेल. शनिवारी मेट्रोचं लोकार्पण झाल्यानंतर मुंबईकरांना या भुयारी मेट्रोने प्रवास करण्याची उत्सुकता लागली होती. प्रवास साडे बारा किलोमीटरचा असून ही सेवा सकाळी ६ ते रात्री १०:३० वाजेपर्यंत उपलब्ध असेल.

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

ADVERTISEMENT

  • 12:54 PM • 07 Oct 2024

    Maharashtra News : पुणे सातारा महामार्गावर काँग्रेस कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

    पुणे सातारा महामार्गावरील कापूरहोळ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा रास्ता रोको करण्यात आले. भाजपचे भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दगडे यांच्या दिवाळी किराणा वाटप कार्यक्रमात, काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्याबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त विधाना विरोधात हे आंदोलन केले.

  • 12:53 PM • 07 Oct 2024

    Maharashtra News : हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेश सोहळा

    इंदापूर- हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेश सोहळा सुरू आहे. इंदापूरमध्ये शरद पवार कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते, माजी उपमुख्यमंत्री विजय सिह मोहिते पाटील यांची उपस्थिती आहे.

     

  • 11:52 AM • 07 Oct 2024

    सोशल मीडियावर माझ्याबद्दल काय लिहिलं जातं, ते मी कधीच वाचत नाही- राज ठाकरे

     

    “सोशल मीडियावर माझ्याबद्दल काय लिहिलं जातं, ते मी कधीच वाचत नाही. मी कोणाला स्पष्टीकरण द्यायलाही जात नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस झाली आहे,” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

     

  • 11:27 AM • 07 Oct 2024

    Maharashtra News : मराठा क्रांती ठोक मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते आझाद मैदानात धडकणार

    मराठा क्रांती ठोक मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते आज आझाद मैदानात धडक देणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री व्हावं आणि मराठा आरक्षण द्यावं या मागणीसाठी आज मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.

follow whatsapp

ADVERTISEMENT