लाइव्ह

Maharashtra Assembly Election 2024 LIVE : काँग्रेसकडून जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न- PM मोदी

मुंबई तक

LIVE Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Maharashtra Assembly Election 2024 News LIVE in Marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातली तसेच उत्तर महाराष्ट्रातील पहिली सभा आज धुळ्यात पार पडणार आहे. विधानसभेतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची ही सभा होत आहे. अडीच हजार पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. भव्य सभा मंडप व्यासपीठ अशी संपूर्ण तयारी पूर्ण झालेली असून सभेला एक लाख लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि महिलाध्यक्ष सुजाताताई घाग यांनी केली आहे.

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर... 

  • 02:27 PM • 08 Nov 2024

    PM Modi : काँग्रेसकडून जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न- PM मोदी

    काँग्रेस लहान-लहान जातींना आपआपसात लढवण्याचे काम करत आहे. काँग्रेस यापूर्वी धर्माच्या नावावर कट रचला. त्यानंतर देशाची फाळणी झाली. आता काँग्रेस जातीच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असे नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात म्हटले.

     

  • 02:25 PM • 08 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात महायुतीचेच सरकार- रावसाहेब दानवे

    काळ्या दगडावरची ही पांढरी रेघ आहे आणि सूर्यप्रकाशापेक्षाही स्वच्छ कोणत्याही परिस्थितीत भविष्यकारालाही सुद्धा विचारायची गरज नाही. या राज्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचे सरकार येणार असल्याचा विश्वास भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

     

  • 01:16 PM • 08 Nov 2024

    PM Modi : मुंबईत आणखी एक विमानतळ होणार- मोदी

    वाढवण बंदराच्या जवळ नवीन विमानतळ करण्यासाठी महायुतीचे सरकारच्या शपथविधी झाल्यावर निर्णय घेण्यात येणार आहे, असे नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात सांगितले.

  • 12:41 PM • 08 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 : PM मोदींच्या प्रचारसभेतील महत्त्वाचे मुद्दे

    • धुळ्यातूनच महाराष्ट्रातील प्रचार अभियानाची सुरूवात करत आहे.
    • मविआच्या गाडीला चाकं, ब्रेकच नाहीत... त्यांनी अनेक प्रकल्पांचे काम थांबवले
    • मविआत ड्रायव्हरच्या सीटवर बसण्यासाठीही वादच सुरू
    • महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे
    • लोकांची लूट करणं हे मविआचं धोरण
    • मविआकडून प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार 
    • विश्वासघातानं बनलेलं मविआचं सरकार सर्वांनी बघितलं
    • शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारमुळे राज्याला गती मिळाली.
    • भाजप-महायुती आहे तर गती आहे, राज्याची प्रगती आहे.
    • विश्वासघाताने बनलेल्या मविआ सरकाराने जनतेला लुटलं
    • शिंदे, फडणवीस, अजितदादांनी जनतेच्या सूचनेवरून वचननामा बनवला
    • आम्ही पुढील 5 वर्षात महाराष्ट्राच्या प्रगतीला नव्या उंचीवर नेणार
    • वचननाम्यात आर्थिक प्रगतीची योजना, समानतेचा भाव... विरोधक लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात
    • सत्ता मिळाल्यावर काँग्रेस लाडकी बहीण योजना बंद करेल
  • 12:15 PM • 08 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 LIVE : मोदींच्या दौरा, भुजबळांचा गौप्यस्फोट!

    छगन भुजबळांच्या भाजपबाबतच्या दाव्यावरून खळबळ उडाली आहे. राजदीप सरदेसाईंच्या 'द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया' या पुस्तकात भुजबळांबद्दल मोठा दावा करण्यात आला आहे. यामध्ये भुजबळ म्हणाले होते की, 'भाजपबरोबर  जाण्याचा आनंद नेत्यांना झाला. नेत्यांच्या आनंदाचं कारण ईडीपासून मुक्ती... ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर, असं वागवलं नसतं.'

    या प्रकरणावरून आता भुजबळांनी पत्रकार परिषद घेत केली सारवासारव?

    'मी लोकसत्ताला अशी कुठलीही मुलाखत दिलेली नाही. ईडीपासून सुटका करण्यासाठी गेलो हा आरोप जुना आहे. कोर्टानं महाराष्ट्र सदन प्रकरणात क्लीनचिट दिली आहे. मला कोर्टात जाण्याची भीती. अडचण आहे या गोष्टींचा इन्कार करतो. आमच्यासोबत असणाऱ्या सगळ्यांवर ईडीची केस नव्हती. मी अजून हे पुस्तक वाचलेलं नाही, मिळवून वाचेल. 

  • 11:53 AM • 08 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 : 'भाजपने महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास केला', विजय वडेट्टीवारांची टीका

    'भुजबळ जे म्हणताय ते खरं आहे, आम्ही आधी हेच बोलत होतो. मात्र आमचे आरोप राजकीय आहे असे सांगितले जात होते. भाजपमध्ये जी लोक गेली आहे, ती सर्व ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवूनच गेली आहेत', अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 'महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास भाजपने केला आहे. क्लीन चीट देणारे तेच आहेत. आरोप लावणारेही तेच आहे आणि भाजपमध्ये प्रवेश देणारेही तेच आहेत,' असंही विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

  • 11:51 AM • 08 Nov 2024

    New Delhi Update News : CJI धनंजय चंद्रचूड आज निवृत्त होणार!

    नवी दिल्ली : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे आज निवृत्त होणार आहे. सरन्यायाधीश पदावरून धनंजय चंद्रचूड आज निवृत्त होणार आहेत.

  • 11:49 AM • 08 Nov 2024

    Maharashtra News : केजमध्ये पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमाला घेतले ताब्यात

    7 नोव्हेंबर रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे केज शहरात गस्त घालीत असताना त्यांना सकाळी १०:३० वा. गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, केज शहरातील रोजा मोहल्ला भागात राहणारा जुबेर मुस्ताक फारोखी यांच्या जवळ गावठी कट्टा असुन तो त्याचा धाक दाखवुन या भागात दहशत माजवत आहे. 

    मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, प्रकाश मुंडे यांना सोबत घेवुन रोजा मोहल्ला येथे गेले. पोलीसांना पाहुन जुबेर मुस्ताक फारोखी पळु लागला. तेव्हा पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन त्यास बस स्टँडच्या पाठीमागे पकडले. त्याची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक सिल्वर रंगाचा देशी बनावटीचा गावठी कट्टा, त्याचे मॅगझीनमध्ये एक जिवंत काडतुस मिळुन आले. जुबेर मुस्ताक फारोखी, वय २७ वर्षे, (रा. रोजा मोहल्ला केज, ता. केज) याचे विरुध्द पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन गु. र. नं. ६००/२०२४ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली

  • 11:44 AM • 08 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 : मंत्री छगन भुजबळ पत्रकार परिषद पॉइंटर...

    ऑन राजदीप सरदेसाई पुस्तक 

    - एक म्हंजे मी लोकसत्ता बोरीबर कुठलेही मुलाखत दिली नाही
    - इडी पासून गेलो हे आरोप सुरू आहे 
    - महारष्ट्र सदन प्रकरणी कोर्टाने क्लीन चिट दिली 
    - तेव्हा ठाकरे यांचे सरकार होते
    - आम्ही विकासा साठी आलो 
    - 54 लोकांनी सह्या केल्या त्यांच्या सर्वांवर आरोप हे नव्हते
    - सद्या आमच्या मतदार संघात 2 हजार कोटी रुपयांचे काम सुरू आहे
    - विकासाठी आलो, त्याचा फायदा झाला
    - निवडणुकीच्या तोंडावर हे सुरू का झाले याचे मला कारण समजत नाही 
    - मी अजून पुस्तक वाचले नाही, ते पुस्तक वाचेल 
    - माझे वकील त्यावर काम करतील 
    - मला जर चुकीचे वाटले तर त्यात मी कारवाई चे काम करेल 
    - नको त्या गोष्टी माझ्या तोंडातून टाकले आहे, याची मी चौकशी करेल 
    - निवडणुकीत हे प्रकाशित का केले त्याचा शोध घेतील 
    - निवडणुकीनंतर त्यावर सविस्तर मी बोलेल 
    - जी कारवाई करता येईल ती मी वकीला मार्फत करेल
    - माझा फोकस सद्या निवडणुकीवर आहे
    - ऑन हाके हल्ला
    - मराठा ओबीसी समाजाने शांतता राखावी
    - कुठलाही कायदा हातात घेऊ नये
    - वातावरण खराब करू नये 
    - कोणीही नको ते वक्तव्य करू नये 

    ऑन मोदी सभा


    - कांद्याचे भाव वाढले त्यावर प्रयत्न केले 
    - येणाऱ्या कुंभमेळा करता मदत आहे, त्यावर सर्व ते तात्काळ निर्णय घेता

  • 10:35 AM • 08 Nov 2024

    Sanjay Raut on Raj Thackeray : भोंगा काढण्यासाठी सत्तेची गरज नाही – संजय राऊत

     

    राज ठाकरे फडणवीसांसोबत सत्तेतच… भोंगा काढण्यासाठी सत्तेची गरज नाही… आपला पक्ष सोडायचा आणि भाजपसोबत जायचं असा दबाव असतो… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं.

     

  • 09:42 AM • 08 Nov 2024

    Maharashtra Assembly Election 2024 : हर्षवर्धन जाधव यांच्या जीवाला धोका! पोलिसात तक्रार दाखल

    कन्नडचे माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याची पोलिसात तक्रार केली आहे. काही गाड्या माझा पाठलाग करत आहेत, काही लोक अपहरणाचा कट रचत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या मागे भाजप नेते रावसाहेब दानवे असल्याचा त्यांचा आरोप आहे

     

follow whatsapp