लाइव्ह

Maharashtra Breaking News : भाजपच्या निवडणुकीसाठी महत्त्वाची समिती, नितीन गडकरी विशेष प्रचारक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra breaking news in marathi : छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा आठ महिन्यात कोसळला. याप्रकरणी प्रमुख आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटेला पोलिसांनी अटक करण्यात आली असून त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.​​​​​​​

मुंबईच्या कमला मिल परिसरातील टाईम्स टॉवरला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड परभणी, लातूर, तसेच धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे. दुसरीकडे विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईसह उपनगरातही आज शुक्रवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि ठाण्यासह संपूर्ण कोकणाला आज पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

लाइव्हब्लॉग बंद

  • 12:24 PM • 06 Sep 2024

    Maharashtra News : भाजपच्या निवडणुकीसाठी महत्त्वाची समिती, नितीन गडकरी विशेष प्रचारक

    भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची जबाबदारी आपल्या अनुभवी नेत्यांवर सोपवली आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे प्रमुख नेतृत्व दिलं जाणार आहे. यासोबतच 20 स्टार प्रचारकांची समिती लवकरच जाहीर केली जाईल, ज्यात रावसाहेब दानवे प्रमुख संयोजक असतील. भाजपच्या या रणनीतीत महाराष्ट्रात एक महिना राहून नितीन गडकरी विशेष प्रचारक म्हणून भूमिका बजावतील.

  • 10:55 AM • 06 Sep 2024

    Maharashtra News : लाडकी बहीण योजने अंतर्गत 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचे वाटप

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित ३ हजार रुपयांची रक्कम डीबीटीव्दारे थेट खात्यात जमा करण्यात आली आहे. या योजनेत अडीच कोटी महिला लाभार्थींना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे अर्ज घेण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत चालू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

     

  • 10:25 AM • 06 Sep 2024

    अजितदादांना अमित शाह, नरेंद्र मोदींच्या दयेवर जगावं लागेल – विजय वडेट्टीवार

    “अजितदादांना अमित शाह, नरेंद्र मोदींच्या दयेवर जगावं लागेल. अजित पवार यांना वाट पहावी लागेल. केंद्रात सरकार 2025 पाहणार नाही, देशात 2026 ला पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागू शकते. अजित पवार यांना गृहीत धरले आहे” अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

     

  • 10:24 AM • 06 Sep 2024

    Maharashtra News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएल बसच्या मार्गांमध्ये बदल

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएल बसच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. 7 ते 17 सप्टेंबर या कालावधीत पर्यायी मार्गावरून बस धावणार आहेत. सायंकाळी पाच वाजता मध्यवर्ती भागातील रस्ते बंद झाल्यानंतर बस मार्गात बदल होणार. 63 मार्गावरील चार हजार 396 फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.

     

follow whatsapp

ADVERTISEMENT