Maharashtra Breaking News : महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात तळलेला बेडूक
Maharashtra Marathi News Live : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लाईव्ह अपडेट्स वाचा...
ADVERTISEMENT
Maharashtra Live Updates : पुण्यात ठाकरे गटाचा मेळावा उद्या होणार आहे. काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला पुण्यातूनच उद्धव ठाकरे काय उत्तर देणार? याकडे लक्ष लागले आहे. अजित पवार आज नाशिक जिल्ह्यातीळ कळवण-सुरगाणा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना छगन भुजबळ मात्र येवला मतदार संघाचा दौरा करणार आहे.
ADVERTISEMENT
अजित पवार यांच्या दौऱ्यात छगन भुजबळ राहणार नाही. वायनाडमध्ये आज चौथ्या दिवशीही मदत कार्य सुरूच राहणार आहे. वायनाडमधील भूस्खलनात आतापर्यंत 292 जणांचा मृत्यू झाला आहे. चिपळूण शहरात भरवस्तीत आलेल्या मगरीचे रेस्क्यु आँपरेशन वनविभागाकडून करण्यात आले. राज्यात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे धरणांचा पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरणात 86.63 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणाची 105 टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे.
या सगळ्या संदर्भातील ताजे अपडेट्स आणि विश्लेषण वाचा लाईव्ह ब्लॉगमध्ये....
ADVERTISEMENT
- 12:09 PM • 02 Aug 2024
Maharashtra News : महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात तळलेला बेडूक
धाराशिव तालुक्यातील पाडोळी येथे तुर डाळ खिचडी या पोषण आहाराच्या पॉकेटमध्ये तळलेला बेडूक सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत 6 महिने ते 3 वर्ष या वयोगटातील बालकांसाठी एनर्जी डेन्स म्हणुन तुर डाळ खिचडी पॉकेट दिले जातात मात्र त्या पोषण आहाराच्या पॉकेटमध्ये चक्क तळलेला बेडूक सापडला आहे. अधिकारी यांनी भेट देत पंचनामा केला असुन तसा अहवाल सादर केला आहे.
पाडोळी येथील पुनम सौदागर जाधव यांना हे आहाराचे पॉकेट देण्यात आले होते, लहान मुलांना खिचडी बनवण्यासाठी त्यांनी हे पॉकेट उघडले असता त्यात तळलेला बेडूक दिसून आला त्यानंतर त्यांनी ही बाब गावातील इतर लोकांना सांगितल्यावर विस्तार अधिकारी पंजरवाडकर व पर्यवेक्षिका सुकाळे यांनी गावात भेट दिली व त्याचा पंचनामा केला व ते पॉकेट सील केले. जुलै ऑगस्ट 24 च्या पोषण आहारात एका बॅचच्या पॉकेटमध्ये हा प्रकार उघड झाला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने लहान मुलांना पोषक आहार मिळावा म्हणून यांचे वितरण करणयात येते परंतु त्याच पोषण आहारामध्ये मागे काही दिवसांपूर्वी साप आढळून आल्याचा विडिओ वायरल झाला होता तर आता धाराशिव येथे पोषण आहारामध्ये बेडूक मिळाल्याने याच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण झाला आहे व यावर काय कारवाई होती याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे - 10:11 AM • 02 Aug 2024
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगर दौऱ्यावर
संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार 60 हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचे मंजुरी पत्र देणार… सिल्लोडचे आमदार आणि संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन…
- 10:07 AM • 02 Aug 2024
Sanjay Raut: भाजपशासित राज्यात लोकशाही राहिली नाही- संजय राऊत
'अयोध्येतील राम मंदिरात गळती, संसद भवनात गळती, ठेकादार कोण होते ते पाहिलं पाहिजे. निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, 2 महिने पैसे देतील आणि नंतर पळून जातील. निवडणुकीला 2 महिने शिल्लक आहेत त्यामुळे हा प्लॅन आहे. भाजपशासित राज्यात लोकशाही राहिली नाही. ', असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
- 08:39 AM • 02 Aug 2024
Pune : पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चार धरणात ९०.७६ टक्के पाणीसाठा
- पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चार ही धरणात 26.46 टी एम सी पाणीसाठा
- गेल्या वर्षी याच दिवशी चार धरणं मिळून 81.22 टक्के पाणीसाठा होता
- यावर्षी धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने मागील वर्षाच्या पेक्षा ९ टक्के जास्त पाणीसाठा या चारही धरणात आहे
- सध्या पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चार ही धरणं मिळून ९०.७६ टक्के इतका पाणीसाठा
- पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा
- खडकवासला: 72.83 टक्के
- पानशेत: 90.72 टक्के
- वरसगाव: 92.82 टक्के
- टेमघर: 93.28 टक्के
ADVERTISEMENT