लाइव्ह

Maharashtra News Live : मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला, ''आपण फेसबुक लाईव्ह नाही तर डायरेक्ट...''

मुंबई तक

Maharashtra Breaking News Live : महाराष्ट्र आणि देशातील राजकीय घटना घडामोडी, हवामान अंदाज आणि इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा लाईव्ह अपडेट्समध्ये....

ADVERTISEMENT

cm shinde, udhhav thackeray
cm shinde, udhhav thackeray
google news

Maharashtra Marathi News Live : महाराष्ट्रात राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीआधी विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी महत्त्वाची परीक्षा आहे. 

लोकसभा निवडणूक निकालात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास बळावल्याचे दिसत आहे. दुसरीकडे महायुतीतील पक्षांकडून नेते, पदाधिकाऱ्यांना बळ दिले जात आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रात पडद्यामागे राजकीय घडामोडी घडत असून, त्यासंदर्भातील लाईव्ह अपेडट्स वाचा...

त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या घटनांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी लाईव्ह ब्लॉग वाचत रहा

  • 09:17 PM • 06 Jul 2024

    मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

    कोविडमध्ये फक्त फेसबुक लाईव्ह आणि वर्क फ्रॉम होम करत होते, असा चिमटा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तसेच आपण फेसबुक लाईव्ह नाही डायरेक्ट फेस टु फेस संवाद साधतो असा टोला देखील शिंदेंनी ठाकरेंना लगावला. 

  • 07:06 PM • 06 Jul 2024

    महायुतीची महत्वाची बैठक सुरु, विधानसभा निवडणुकीची रणनीती आखणार?

    शुक्रवारी महाविकास आघाडीची वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये महत्वाची बैठक पार पडल्यानंतर आज महायुतीच्या षण्मुखानंद सभागृहात महत्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक तसेच 12 जुलै रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती यावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशिवाय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.याशिवाय तिन्ही पक्षांचे आमदार, खासदार आणि अधिकारी यांचाही या बैठकीत समावेश असणार आहे. 
     

  • 04:38 PM • 06 Jul 2024

    ''सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, नाहीतर...'', जरांगेंचा सरकारला इशारा

    छगन भुजबळांच ऐकूण मराठ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर 288 पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून येऊ देणार नाही. त्यामुळे सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, असे मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोलीच्या शांतता रॅलीत बोलत होते. 

  • 04:21 PM • 06 Jul 2024

    Maharashtra Live : "युवा बालबुद्धीने...', आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

    मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना बालबुद्धी म्हणत निशाणा साधला. 

    "कलानगरच्या युवा बालबुद्धीने स्वार्थी राजकारणासाठी मुंबई आणि क्रिकेटचा आसरा घेणे बंद केले पाहिजे. ICC क्रिकेट विश्व कपचा कार्यक्रम अनेक वर्ष आधी तज्ज्ञांच्या समितीकडून निश्चित केला जातो. आपल्या मनमर्जीप्रमाणे ठरवायला ही काही गल्लीतील नाईटलाईफ पार्टी नाहीये. युवा बालबुद्धी ला आयसीसीची प्रक्रिया आणि धोरणांबद्दल शिक्षित करण्याबद्दल मला आनंद होईल, जेणेकरून ते अशा टिप्पण्या करण्यापासून दूर राहतील. खेळ आणि राष्ट्रीय हिताचा दुरुपयोग कधीही नीच व्यक्तिगत राजकारणासाठी केला नाही पाहिजे", असे शेलारांनी म्हटले आहे.

     

  • 12:17 PM • 06 Jul 2024

    Ravindra Waikar News : वायकरांना क्लीन चिट, सोमय्या म्हणाले...

    रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चीट देण्यात आली आहे. त्यावर किरीट सोमय्या म्हणाले की, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं म्हणून मी या प्रकरणावर कोणतेही भाष्य करणार नाही.

    किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांनी फसवणूक करून पंचतारांकित हॉटेल बांधल्याचा आणि ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. 

  • 10:13 AM • 06 Jul 2024

    Nashik Newsu Updates : पंचवटी एक्स्प्रेसचा कपलिंग तुटले

    नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग तुटल्याची घटना शनिवारी घडली. त्यामुळे इंजिन आणि एक डबा वेगळा झाला. इंजिन व एक डबा पुढे गेले, तर बाकी डबे मागेच राहिले.

    कसारा स्थानकाजवळ ही घटना घडली. स्टेशनजवळ गाडीचा वेग कमी असल्याने दुर्घटना थोडक्यात टळली. मात्र, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. 

    माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटना स्थळी पोहोचले. पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग जोडण्याचे काम हाती घेण्यात आले. कसारा स्टेशनच्या आधी रेल्वे घाट सेक्शनमधून जाते. तिथे कपलिंग तुटले असते पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली असती.

  • 10:09 AM • 06 Jul 2024

    Vidhan Parishad Election Update : कोणाचा होणार 'कार्यक्रम'?

    विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत असून, 12 उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीने 9 उमेदवार दिले आहेत. तर महाविकास आघाडीने 3 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. 

    महाविकास आघाडी आणि महायुतीने आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. पण, महायुती आणि महाविकास आघाडीला सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांचे गणित जुळवून आणावे लागणार आहे. 

    पहिल्या पसंतीच्या २३ मतांचा कोटा आहे. त्यामुळे या निवडणुकीत कुणाला बेरजेचे राजकारण जमणार? याबद्दल उत्सुकता आहे. महत्त्वाचे म्हणजे १२ पैकी ११ उमेदवारच आमदार होणार आहेत, त्यामुळे पराभूत होणारा १२ उमेदवार कोण असेल, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.