Maharashtra CM: फडणवीसांच्या चेहऱ्यावर हास्य, एकनाथ शिंदे मात्र... 'त्या' फोटोने सगळंच केलं क्लिअर?

मुंबई तक

Maharashtra New CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण यासाठी अमित शाह यांच्या निवासस्थानी अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. ज्याचे काही फोटो हे समोर आले आहेत. याच फोटोंमध्ये शिंदे आणि फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील नेमके भाव काय आहेत यावरून वेगवेगळे अंदाज हे आता वर्तवले जात आहेत.

ADVERTISEMENT

'त्या' फोटोने सगळंच केल क्लिअर?
'त्या' फोटोने सगळंच केल क्लिअर?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अमित शाह यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली

point

बैठकीतील दोन फोटो आले समोर

point

फोटोमध्ये एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव

Eknath Shinde: नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं. पण तो नेता नेमका कोण? याबाबत गेल्या काही दिवसांपासून तिढा कायम आहे. त्यावरच नेमका तोडगा काढण्यासाठी आज (28 नोव्हेंबर) रात्री उशिरा भाजपचे गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक पार पाडली. ज्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे हजर होते. याच बैठकीचा एक फोटो समोर आला ज्यावरून आता वेगवेगळे कयास लावले जात आहे. (maharashtra new cm devendra fadnavis has a smile on his face but eknath shinde face is expressionless photos from the meeting with amit shah surfaced)

अमित शाह यांच्यासोबत तीनही नेत्यांची तब्बल अडीच तास बैठक पार पडली. ज्यामध्ये मुख्यमंत्री पदासह मंत्रिपदं आणि खाती यावर बरीच चर्चा झाली. पण याच बैठकीआधी तीनही नेत्यांनी अमित शाह यांचं स्वागत केलं. ज्याचा फोटो हा समोर आला. ज्यावरून नव्या चर्चेला उधाण आलं आहे.

हे ही वाचा>> Maharashtra New CM LIVE: मुख्यमंत्री ठरवणारी बैठक सुरू, अमित शाह घेणार फायनल निर्णय

'त्या' फोटोमधलं नेमकं गुपित काय?

अमित शाहांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यानचे जे दोन फोटो समोर आले आहेत त्यापैकी पहिल्या फोटोत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे अमित शाह स्वागत करत असल्याचं पाहायला मिळालं. तर दुसऱ्या फोटोमध्ये अजित पवार हे अमित शाहांचं स्वागत करत होते. या फोटोमध्ये अमित शाह, अजित पवार यांच्यासह जेपी नड्डा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे असल्याचं दिसून आलं.

पहिला फोटो: या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीसा हे अमित शाह यांना फुलांचा गुच्छ देत त्यांचं स्वागत करत आहेत. तर एकनाथ शिंदे हे यावेळी शाहांच्या बाजूला उभे आहेत. या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस हे स्मितहास्य करताना दिसत आहे. त्यांचं हेच हास्य बरंच काही सांगून जात असल्याचं आता बोललं जात आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर अमित शाह हे शिक्कामोर्तब करू शकतात अशी जोरदार चर्चा आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp