Maratha Reservation : शिंदे सरकार अ‍ॅक्शन मोडवर! वर्षा बंगल्यावरील बैठकीत काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

maratha reservation cm ekanth shinde varsha bunglow meeting manoj jarange patil agitation mumbai azad maidan
maratha reservation cm ekanth shinde varsha bunglow meeting manoj jarange patil agitation mumbai azad maidan
social share
google news

CM Eknath shinde Varsha Bunglow Meeting, Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी उभारलेले आंदोलन मुंबईच्या दिशेने वळवले आहे. आज सकाळीच जरांगेंनी आंतरावली सराटीतून मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. त्यामुळे सरकारला चांगलीच धडकी भरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी या आंदोलनाचा धसका घेऊन तातडीने वर्षा बंगल्यावर बैठक बोलावून युद्धपातळीवर काही निर्णय घेतले आहेत. नेमके या बैठकीत काय निर्णय झाले आहेत? आणि या निर्णयाचा मराठा समाजाला काय फायदा होणार? हे जाणून घेऊयात. (maratha reservation cm ekanth shinde varsha bunglow meeting manoj jarange patil agitation mumbai azad maidan)

मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणविषयक बैठक पार पडली. या बैठकीस निवृत्त न्या. दिलीप भोसले, निवृत्त न्या. मारोती गायकवाड, निवृत्त न्या. संदीप शिंदे, महसूल अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास प्रधान सचिव डॉ के एच गोविंदराज, इतर मागास विभागाचे सचिव अंशू सिन्हा, विधि व न्याय सचिव कलोते, यांची उपस्थिती होती.

हे ही वाचा : NCP : क्या हुआ तेरा ‘दादा’? ‘तो’ व्हिडिओ शेअर केला अन् अजितदादांनाच घेरलं

या बैठकीत मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची तसेच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचे काम 23 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत होणार असून मराठा व बिगर मराठा खुला प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येईल अशारीतीने राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटूंबांचे सर्वेक्षण होणार आहे. याकामी गोखले इन्स्टिट्युट, आयआयपीएस, या नामांकित संस्थांची मदत होणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तहसीलदारांनी दररोज अहवाल द्या

हे सर्वेक्षण अतिशय महत्वाचे असून तीनही शिफ्ट्समध्ये काम करावे. गावोगावी या सर्वेक्षणाबाबत दवंडी द्या, ग्रामपंचायतीच्या फलकांवर सुचना द्या तसेच विविध माध्यमातून लोकांना याविषयी माहिती द्या. सर्वेक्षणाला येणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक घरातून माहिती मिळाली पाहिजे म्हणजे परिपूर्ण आणि बिनचूक सर्वेक्षण होईल. सर्वेक्षणाच्या काळात तहसीलदार आणि सर्व संबंधितांनी दररोज आपल्या कामच अहवाल द्यायचा आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, तलाठी असे सव्वा लाख पेक्षा जास्त प्रगणक 8 दिवसात हे काम पूर्ण करणार आहे. 36 जिल्हे, 27 नगरपालिका, 7 कॅन्टोनमेंट क्षेत्रात प्रशिक्षण आजपासून सुरु झाले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Sania Mirza सोबत घटस्फोट? शोएब मलिकने ‘या’ अभिनेत्रीसोबत केलं तिसरे लग्न..

न्या गायकवाड अहवालातील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, 2008 मधील अहवाल आणि सध्याचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल यात नेमका काय फरक आहे आणि नव्याने कसा हा इंटेन्सिव्ह डेटा संकलित करण्यात येत आहे हे व्यवस्थित तयार करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

ADVERTISEMENT

वंशावळीसाठी समिती नेमा

कुणबी नोंदीबाबत वंशावळी जुळविणे महत्वाचे असून नोंदीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी बार्टी तसेच इतर सक्षम संस्थेच्या तज्ज्ञांचे पथक तातडीने नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. या पथकात मोडी भाषा तज्ज्ञ, तहसीलदार यांचा समावेश करा. ज्या गावांत अत्यल्प नोंदी सापडल्या आहेत तिथे परत खातरजमा करण्यासाठी विशेष मोहीम राबवा, दवंडी द्या, तसेच पोलीस पाटील व खासगी व्यक्तींकडे काही कागदपत्रे असतील तर तीही स्वीकारा असेही मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.

दरम्यान आतापर्यंत निवृत्त न्या, संदीप शिंदे यांच्या समितीने काम सुरु केल्यापासून 1 लाख 47 हजार कुणबी नोंदी प्रमाणपत्रे मराठ्यांना वितरीत करण्यात आले आहेत. एकट्या मराठवाड्यात 32 हजार नोंदी आढळल्या असून 18 हजार 600 कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत. न्या संदीप शिंदे समितीने लातूर, मराठवाड्यात बैठकीची दुसरी फेरी पण पूर्ण केली आहे अशी माहिती सुमंत भांगे यांनी यावेळी दिली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT