छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शिकवलं? बायका-मुलांवर…, भुजबळ काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Minister Chhagan Bhujbal criticizes Manoj Jarange Patil over Maratha agitation
Minister Chhagan Bhujbal criticizes Manoj Jarange Patil over Maratha agitation
social share
google news

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील येवल्यामध्ये अवकाळी पावसाची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांचा ताफा ज्या ठिकाणीहून गेला होता. त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून रस्ता पवित्र करण्यात आला होता. त्यावरूनच छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. इंदापूरमध्ये झालेल्या ओबीसी एल्गार परिषदेतून (OBC Elgar Parishad) त्यांनी टीका केली. छगन भुजबळ यांनी आजही जरांगे पाटलांवर जोरदार टीका करत त्यांनी आम्ही शूद्र आहोत तर तुम्ही आमच्या शूद्रपणात का येता असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ADVERTISEMENT

मग कशाला आमच्या आरक्षणात येता?

आम्ही ज्या रस्त्यावरून गेलो होतो तो तो रस्ता तुम्ही गोमूत्र शिंपडून पवित्रा केला होता. त्या घटनेवरून छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्याचवेळी त्यांनी शूद्रतेच्या मुद्यावरून जरांगे पाटील यांना छेडले आहे. आम्ही आहे शूद्र तर तुम्ही मग आमच्या आरक्षणात का येता असा सवाल करून त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा >> Sindhudurg : पुण्यातील 6 विद्यार्थी देवगड समुद्रात बुडाले, नेमकं काय घडलं?

सिलेक्टीव्ह गावबंदी

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन छेडल्यानंतर गावागावातून राजकीय नेत्यांना गावबंगदी करण्यात आली. मात्र जरांगे पाटलांच्या आंदोलनाने दुजेभाव केल्याचा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. कारण आम्हाला सोडून काही नेत्यांना गावामध्ये प्रवेश देण्यात आला होता. त्यावेळी त्यांना कसा काय प्रवेश देण्यात आला असे म्हणत तुमची गावबंदी ही सिलेक्टिव्ह गावबंदी असल्याचा घणाघात करण्यात आला. कारण त्यांना गावात बंदी होती, तर त्याचवेळी रोहित पवार यांची सभा कशी काय होती असा सवालही त्यांनी केला आहे.

हे वाचलं का?

तू डोक्याने दिव्यांग

मनोज जरांगे यांनी आमदार नारायण कुचे यांच्या शारीरिक व्यंगावर टीका केली होती. त्यावर बोलताना ते म्हणाले की, कुणाच्याही व्यंगावर टीका करणे चूक आहे. जरांगे पाटील आपण त्यांना दिव्यांग म्हणता. त्यावरून त्यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी जरांगे पाटील यांची हिंदी भाषा कशी आहे ते त्यांनी वाचून दाखवली. त्यानंत ते म्हणाले की, तू डोक्याने दिव्यांग झाला आहे तुला हिंदीसुद्धा येत नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

शिवाजी महाराजांनी हे शिकवलं?

बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सांळुखेंच्या घरावर हल्ला चढवून त्यांचे घर जाळण्यात आले होते. त्यावरूनही मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तोफ डागली. बीडमध्ये आमदारांच्या घरावर हल्ले करण्यात आले. त्यांच्या बायका-मुली कशातरी वाचल्या. त्यावरून छगन भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शिकवलं आहे का? आपल्याच स्वकियांवर, बायका-मुलांवर हल्ला करा? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘पोषण आहारात अंडी देण्याऐवजी…’, भाजप अध्यात्मिक आघाडीची मोठी मागणी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT